आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​अपात्रता प्रकरण:‘आम्ही भाजप साेडलेलाच नाही, आजही पक्षाचे नगरसेवक म्हणून कायम आहाेत’

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील ५४ नगरसेवकांविराेधात दाखल अपात्रतेच्या अपिलाच्या कामाला गती आली आहे. दहा आठवड्यांत निर्णय द्यायचा असल्याने साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात येत आहेत. एका अपिलात विभागीय आयुक्तांनी उपमहापाैर कुलभूषण पाटील यांना ४२ प्रश्न करत त्यांची साक्ष नाेंदवली. यात आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडून आलाे, पक्ष साेडलेला नसून, आजही नगरसेवक म्हणून कायम असल्याचा जबाब दिला. आता या संदर्भातील पुढची सुनावणी ६ सप्टेंबर राेजी हाेणार आहे.

जळगाव महापालिकेतील भाजपत फूट पडल्यानंतर दाेन्ही गटांकडून परस्परविराेधी अपात्रतेचे अपील दाखल करण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी दाखल अपिलात औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर विभागीय आयुक्तांनी सुनावणीची गती वाढवली आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमाेर बंडखाेर गटाकडून उपमहापाैर कुलभूषण पाटील यांची तर भाजपकडून नगरसेवक राजेंद्र मराठे यांची साक्ष नाेंदवण्यात आली. यावेळी दाेन्ही साक्षीदारांना सारखेच प्रश्न उपस्थित करण्यात आले. यात नगरसेवकांना व्हीप बजावला हाेता का?, बजावलेला व्हीप अधिकृत हाेता का?, व्हीप बजावण्याचा अधिकार काेणाला असताे. त्याचा तुम्हाला अधिकार हाेता का?, तुम्ही काेणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आला आहात?. व्हीप कसा बजावला जाताे?, पक्षाची घटना वाचली आहे का?, महापालिका अधिनियमात गटनेता पदाची व्याख्या काय आहे?, गटनेता निवडताना काेणत्या निकषानुसार बदल केला?, बहुमताचा आकडा हाेता का? यासारखे ४२ प्रश्न विभागीय आयुक्तांकडून करण्यात आले.

बहुमताने केली अॅड. दिलीप पाेकळेंची गटनेते पदावर निवड
साक्षीदरम्यान उपमहापाैर पाटील यांनी आम्ही भाजपा पक्ष साेडलेला नाही. आजही नगरसेवक म्हणून काम करीत आहाेत. भगत बालाणी यांची निवड हीदेखील बहुमताने केली हाेती. अॅड. दिलीप पाेकळे यांची निवडदेखील नगरसेवकांची बैठक घेऊन ३० नगरसेवकांनी एकमताने केल्याचे सांगत घटनेनुसारच ही निवड केल्याचे सांगितले. राजेंद्र मराठे यांनीदेखील पक्षाच्या वतीने आपली साक्ष नोंदवली. दरम्यान, येत्या मंगळवारी भाजपचे मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, विनाेद मराठे, संजय लुल्ला, परेश जगताप, रमेश जाेगी यांची साक्ष विभागीय आयुक्तांकडे नाेंदवली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...