आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूव्ही इंडेक्स अवघ्या चारवर:वातावरण ढगाळ; थंडीची तीव्रता कमी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी आकाश तब्बल ६० टक्के ढगाळ हाेते. ढगाळ वातावरणाने सूर्याच्या अतिनील किरणाचा यूव्ही इंडेक्स अवघ्या चारवर आल्याने उन्हाची तीव्रता घटली. किमान तापमान १७.६ अंशांपर्यंत वाढल्याने थंडीची तीव्रता कमी हाेऊन वातावरण काहीसे दमट झाले हाेते. शनिवारपर्यंत ताशी चार ते पाच किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेगही रविवारी पहाटेपासून ताशी आठ ते १० किमीपर्यंत वाढला हाेता. गेल्या आठवड्यापासून वातावरणात सतत बदल हाेत आहे. तापमानात माेठ्या प्रमाणात वाढ आणि घट हाेत असल्याने थंडी आणि उन्हाची तीव्रताही वेगवेगळी आहे. रविवारी किमान तापमानात १७.६ अंशांपर्यंत वाढ झाल्याने थंडी घटली. दुपारी ३ वाजेपर्यंत वातावरण ६० टक्केपर्यंत ढगाळ हाेते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दाेन दिवस अशी स्थिती असेल.

बातम्या आणखी आहेत...