आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवरण:गळक्या 110 बसेसला ‘वेदर स्ट्रिप’चे आवरण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाची ११ आगारे आहेत. या आगारांच्या ताफ्यात ७०० बसेसचा ताफा आहे. संपानंतर एसटी मार्गावर येत आहे. पावसाळाही काही दिवसांवर येऊन ठेपल्याने एसटी महामंडळाने प्रत्येक आगारात गळक्या बसेसची तपासणी सुरू केली. यात ११० गळक्या बसेसला ‘वेदर स्ट्रिप’ बसवण्यात आले. दरम्यान, कोरोना व एसटी कर्मचारी संपामुळे अनेक गाड्या जागेवरच थांबून असल्याने तुटक्या खिडक्यांची समस्या एकाही गाडीत आलेली नाही. एसटी महामंडळातील ११ आगारांतील ग्रामीण, मुक्कामी व लांबपल्ल्याच्या सर्वच बसेस धावायला लागल्या आहेत. आगामी पावसाळ्यामुळे त्या-त्या आगारात व एसटीच्या जळगाव कार्यशाळेत या गाड्यांची पाहणी करून त्यांना ‘वेदर स्ट्रिप’चे आवरण देण्यात आले. त्यामुळे एसटीच्या ताफ्यातील ११० गाड्यांना ‘वेदर स्ट्रिप’ बसवण्यात आले. यात ११० व ५० एमएमचे आवरण बसवण्यात येऊन पावसाळ्यापूर्वीच वाहन तयार करण्यात आले. एकही तुटकी खिडकी नाही : कोरोना व कर्मचारी संपामुळे बसेस जागेवरच थांबून असल्याने तुटक्या काचांची खिडकी एकाही आगारात दिसून आली नाही. खिडकीच्या काचा फुटण्याची समस्या ही अपघात वा दगड उडूनच होत असते. मात्र, अशी घटना घडल्यास अशी गाडी वर्कशॉपला आणून त्या गाडीची काच बदलवण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...