आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारा वाढणार:एप्रिलमध्ये नऊ दिवस‎ पारा 40 अंशांच्या पुढे‎, मे महिन्यात तापमान 46 अंशांवर जाण्याची शक्यता‎

जळगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव‎ कडक उन्ह, मुसळधार पाऊस व गारपीट‎ अशा तीनही प्रकारचे धक्के यंदाच्या एप्रिल ‎महिन्याने दिले. कमाल १९ तर किमान ४२.४ ‎अंश सेल्सिअस तापमान एप्रिलमध्ये‎ राहिले. तर ३० पैकी नऊ दिवस पारा‎ चाळिशी पार गेला.

मे महिन्यात पंधरा दिवस पारा चाळिशीच्या‎ पुढे तर सर्वाधिक तापमान ४६ अंशांवर जाण्याची शक्यता आहे.‎

आरबी समुद्रात दबाव

एप्रिल महिन्यात किमान तापमान हे १९‎ डिग्री सेल्सिअसपर्यंत आले तर कमाल‎ तापमान हे ४२.४ डिग्रीपर्यंत पोहोचले.‎ एप्रिल महिन्यात कधीही अपेक्षित नसलेली‎ गारपीट यंदा झाली. अरबी समुद्रात निर्माण‎ झालेली दबावाची स्थिती आणि बाष्पयुक्त‎ ढगांची निर्मिती या मुळे ही गारपीट झाली.‎

सकाळी हिवाळा, दुपारी उन्हाळा आणि‎ संध्याकाळ झाली की पावसाळा असे‎ तीनही ऋतूंची अनुभूती देणारा एप्रिल‎ महिना ठरला. दरम्यान, या तापमानाच्या‎ चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान‎ झाले. १२ ते १७ आणि १९ ते २१ एप्रिल असे‎ नऊ दिवस पारा चाळीशीपार गेला होता.‎

चक्रीवादळातून दिलासा‎

येत्या ७ ते ९ मे दरम्यान बंगालच्या‎ उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळ‎ निर्माण होण्याची शक्यता आहे. या‎ स्थितीचा परिणाम महाराष्ट्राच्या‎ किनारपट्टी लगत होऊ शकतो. मात्र,‎ जळगाव जिल्ह्यावर त्याचा परिणाम‎ हाेणार नाही असा अंदाज आहे.‎