आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरकुल खटल्यात नियमित जामीन झाल्यानंतर माजी आमदार सुरेश जैन यांचे बुधवारी रात्री ८.५७ वाजता जळगावात आगमन झाले. जुन्यांसह नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे रेल्वे स्थानकावर प्रचंड उत्साहात स्वागत केले. समर्थकांच्या प्रचंड गर्दीमुळे रेल्वे स्थानकातून बाहेर पडायला अर्धा तास लागला. घरकुल घाेटाळ्यात ४८ नगरसेवकांसह दाेषी ठरवलेले माजी आमदार सुरेश जैन यांचा ३० नाेव्हेंबर राेजी जामीन मंजूर झाला हाेता.
धुळे न्यायालयात निकालाच्या कामकाजासाठी गेलेल्या जैन यांचे तब्बल १२०० दिवसांनी जळगावात बुधवारी आगमन झाले. या वेळी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर रेड कार्पेट अंथरण्यात आले हाेते. राजधानी एक्स्प्रेस रात्री ८.५७ वाजता जळगाव स्थानकावर थांबताच जैन यांच्या समर्थकांनी जाेरदार घाेषणाबाजी केली.
समर्थकांचे खिसे कापले, माेबाइलही लंपास
रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीत चाेरट्यांनी हात साफ करून घेतले. या वेळी गर्दीत खिसे कापून तसेच खिशातील एेवज लांबवण्यात आल्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांना आर्थिक फटका साेसावा लागला. काहींचे माेबाइल लांबविण्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.