आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील वर्षाप्रमाणे यंदा सुद्धा कोरोना संकटात निर्बंध लावल्याने अनेक समारंभांवर मर्यादा आल्या आहे. लग्नाचे निमंत्रण, लग्नसोहळा तसेच स्वागतसमारंभाचे आमंत्रण देण्यासाठी कागदी लग्नपत्रिकेऐवजी डिजिटल ट्रेंड वाढतो आहे. फोटो इन्व्हिटेशन, व्हिडिओ इन्व्हिटेशन असे निमंत्रणाचे नवे प्रकार पुढे आले असून, मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत ‘लाइव्ह विवाह’ सोहळ्यांना पसंती दिली जात आहे.
विवाह समारंभादरम्यान समूह संसर्गाची भीती लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या जीवनातला महत्त्वाचा घटक परंतु २० वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने सोहळा पार पाडावा लागत आहे. लग्नाचे निमंत्रण, लग्नसोहळा तसेच स्वागतसमारंभाचे आमंत्रण देण्यासाठी कागदी लग्नपत्रिकेऐवजी डिजिटल ट्रेंड वाढतो आहे. फोटो इन्व्हिटेशन, व्हिडिओ इन्व्हिटेशन असे निमंत्रणाचे नवे प्रकार पुढे आले आहेत. लग्न म्हटले, की आकर्षक लग्नपित्रका, देवदेवतांची छायाचित्रे, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावांची लांबलचक यादी, निमंत्रक, कार्यवाह, स्वागतोत्सुक असे सर्व वेगवेगळे रकाने पत्रिका व्यापून टाकतात पण कोरोना काळात कागदी लग्नपत्रिका हद्दपार होताना दिसून येत आहे. याला पर्याय म्हणून डिजिटल पत्रिकेची संकल्पना पुढे येत आहे.
काळानुसार व्यवसायाचे बदलतेय स्वरुप
कोरोनाकाळात डिजिटल निमंत्रणपत्रिकेची मागणी वाढली अाहे. विविध पॅकेजमध्ये हे उपलब्ध आहे. सोहळ्याची फोटोग्राफी लाइव्ह दाखवण्याची मागणी आहे. खासकरून शहरी भागात या प्रकाराला पसंती दिली जात आहे. बदलत्या काळानुसार या व्यवसायाचे स्वरुपही बदलत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार सेवा दिली जात आहे. - योगेश सूर्यवंशी, छायाचित्रकार
वेगवेगळे पत्रिकेेचे दर असे
सध्या लग्नसोहळ्याचे निमंत्रण पोस्टर, व्हिडिओग्राफी व लाइव्ह प्रक्षेपणाचे वेगवेगळे दर लावले जात आहेत. फोटो इन्व्हिटेशनचे दर २ ते ७ हजार रुपये, व्हिडिओ इन्व्हिटेशनचे ४ ते १० हजार रुपये, सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण १५ ते ५० हजार रुपये असे आहेत.
विविध ग्राफिक्स, गीतांचा वापर, संसर्गाचा नाही धोका
फोटो इन्व्हिटेशनमध्ये वर-वधू छायाचित्रे, नाव, विवाह तारीख व स्थळ इतकाच मजकूर डिझाइन करून बाकीच्या गोष्टींना लग्नपत्रिकेतून फाटा दिला जात आहे, तसेच व्हिडिओ इन्व्हिटेशनमध्ये विविध ग्राफिक्सचा, गीतांचा वापर करीत ३० सेकंदांचे आकर्षक व्हिडिओ बनवले जात आहेत. हे व्हिडिओ स्टेटसला ठेवणे, तसेच फेसबुकवरून शेअर केले जात आहेत. निमंत्रण व्हॉट्सॲपवर पाठवत लग्नाचे निमंत्रण दिले जात आहे. यामुळे थेट भेट घेऊन लग्नपत्रिका देणे टाळले जात असल्याने कोरोना संसर्गाचा धोकाही कमी झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.