आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोक्यात पडला पाइप:नवे कपडे घेता यावे म्हणून कामाला गेला, पहिल्याच दिवशी जीव गमावला

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसऱ्याला नवे कपडे घेण्यासाठी हजार रुपये स्वत: कमवावे या विचाराने एका बांधकामावर काम करायला गेलेल्या २० वर्षीय तरुणाचा पहिल्याच दिवशी कामाच्या ठिकाणी डोक्यात लोखंडी पाइप पडून मृत्यू झाला. ही दुर्घटना घडली तेव्हा काम संपायला अवघा एक तास शिल्लक होता.

प्रथमेश संतोष वाघ असे या खेडी-आव्हाणे येथील दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील स्कूल बसचे चालक म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे. संतोषला एक १६ वर्षाचा भाऊ असून त्याचे शिक्षण सुरू आहे. नगरसेवक सुरेश सोनवणे यांच्या माहितीनुसार संतोषला नागपूर येथे नातलगांकडे जायचे होते. त्यासाठी नवे कपडे घ्यायचे होते. ते पैसे स्वत: कमवावे या विचाराने त्याने दोन दिवस बांधकामावर मजूर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी तो मेहरूण तलावाजवळ सुरू असलेल्या बांधकामावर युनूस मिस्त्री यांच्याकडे कामाला गेला. सायंकाळी पाच-साडेपाच वाजता त्याच्या डोक्यात स्लॅबला लावलेल्या सेंट्रिंगचा पाइप पडला. त्यामुळे तो जबर जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच अवघ्या काही तासांत त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...