आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंनी काढली महाजनांची फर्दापूर गेस्ट हाऊसवरची भानगड:म्हणाले - त्यांचे अनेक प्रेमसंबंध, कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिल्याचा दावा

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात सध्या वाद सुरू आहे. यावेळी बोलताना खडसे यांनी महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर महाजनांची काय भानगड झाली हे मी पाहिले आहे. गिरीश महाजन यांचे अनेक प्रेम संबंध आहेत. याचा कधी उल्लेख मी केला नाही. एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असा विखारी टीका केली आहे.

भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या कुटुंबावर टीका केल्यानंतर दोघांमधील वाद वाढत चालला असून त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

खडसे काय म्हणाले?

गिरीश महाजन यांचे अनेक कृत्य मी पाहिले आहे. फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. तेव्हा पेपरमध्ये चवीने ही चर्चा रंगली होती, ​​​​​ असे म्हणत खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

महाजन यांचे वक्तव्य काय?

महाजन म्हणाले की, ते माझ्या मुलाबाळांवर जात असतील, तर आमदार एकनाथ खडसेंना एक मुलगा होता. 32 व्या वर्षी त्याला काय झाले? कुणामुळे झाले, हा ही संशोधनाचा विषय आहे. मी जर बोललो तर त्यांना जास्त झोंबेल. तुमच्या मुलाचे काय झाले? आत्महत्या झाली की खून झाला, हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, त्यातच तुमचे भले असल्याचे प्रत्युत्तर महाजन यांनी दिले.

खडसे काय म्हणाले?

महाजनांवर बोलताना खडसे म्हणाले की, या वक्तव्यामुळे आमचे कुटुंब भावूक झाले. महाजन यांनाच मृत्यूचे कारण माहित असावे, असे म्हणत खडसे यांनी मला यावर बोलायचे नाही म्हणत पडदा टाकला आहे. गिरीश महाजन यांनी केलेले विधानाने माझ्या कुटुंबाला खूप वेदना होत आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर माझ्या परिचयातील जवळपास 60 ते 70 जणांनी मला फोन करून विचारणा करत यांचा निषेध केला आहे.

बातम्या आणखी आहेत...