आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:राऊतांच्या डोक्यात मेंदू कोणता ; पालकमंत्री

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार संजय राऊत मेंदूचे डॉक्टर थोडेच आहेत. त्यांच्या डोक्यात कोणता मेंदू आहे हे सांगितले तर बरे होईल. बोलणे आणि प्रसिद्धी मिळवणे हे त्यांचे कामच आहे. त्यांच्या म्हणण्याला महत्त्व द्यावे असे वाटत नसल्याची टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री पाटील उत्तरे देत होते.

ठाणे बंदवरून राऊत यांनी त्यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू असल्याची टीका केली होती. मंत्री पाटील यांनी मविआच्या मोर्च्याचाही समाचार घेतला. मोर्चे काढणे हे विरोधकांचे कामच आहे. मोर्चे काढलेच पाहिजेत. मोर्चे काढल्याशिवाय विरोधी पक्ष जिवंत राहत नाही. आपली बाजू सांगण्यासाठी मोर्चा हे सर्वात मोठे अस्त्र आहे.

विरोधी पक्षात असताना आम्हीही दरवर्षी मोर्चे काढायचो. पक्ष जागा असल्याची ती एक प्रवृत्ती असते. त्यांच्या माेर्चात चांगल्या मागण्या असतील तर निश्चितपणे सरकार त्यांचा विचार करेल. मागण्या करण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जावे लागते. चर्चेची मागणी करावी लागते. त्यांनी न ऐकल्यास मोर्चा काढण्याबाबत सांगावे लागते. त्यांनी सोयरीक केलीच नाही. कसे म्हणणार प्रश्न सुटले नाहीत असे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...