आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्लॅमरस जगात सहज दिसते ते काम साेपे नसते; यशासोबतच प्रचंड मेहनतही करावी लागणार

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्यांपूर्वी कलर्स टीव्हीवरील मुस्कुराने की वजा तुम हो या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी शहरातील तन्वी मल्हारा हिला मिळाली होती. सहा महिने ही मालिका सुरू राहिल्यानंतर नुकत्याच गेल्या महिन्यात मालिकेचा समारोप झाला. या मालिकेत काम करताना खूप शिकायला मिळाले. बाहेरून जे आपल्याला सहज दिसते ते सोपे नसून इंडस्ट्रीमध्ये काम करताना दिवस-रात्र एक करावे लागतात. मालिका जरी संपली असली तरी काही महिन्यातच पुन्हा चित्रपटात काम करताना दिसून येणार असल्याची माहिती अभिनेत्री तन्वी मल्हारा हिने पत्रकार परिषदेत दिली.

रिअॅलिटी शोच्या माध्यमातून तनय मल्हारा, शिवम वानखेडे यांनी जळगाव शहराचे नाव उंचावल्यानंतर जळगावातील तन्वी मल्हारा हिने ही सीरिअलच्या दुनियेत पाऊल ठेवत शहराचे नाव उंचावले आहे. कलर्स टीव्हीवर ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ या मालिकेत तन्वीने मुख्य अभिनेत्रीचे पात्र साकारले होते. तिच्या सोबत सुप्रसिद्ध कलाकार कुणाल जयसिंग होता. तन्वीने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरुवात केली. नाशिक येथे आरजे म्हणून कामदेखील केले होते. दोन वर्षांपूर्वी ऑडिशन देण्यास सुरुवात केली हाेती. सिरियल करण्याची कोणतेही इच्छा नसताना आपल्या अभिनयामुळे काम मिळाले व नंतरच त्याची आवड निर्माण झाल्याचे तन्वीने सांगितले.

मालिका बंद तरी ही करिअरला मिळाली नवी दिशा
मालिकेत अनोखी प्रेमकथा दाखवण्यात आली होती. ऑडिशन देण्यापासून तर सिरियल संपेपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. दिवसरात्र काहीच कळत नव्हते. दिवसभरात २ ते ३ तास झोप घ्यायला मिळायचे. शूटिंगमध्येच सर्व वेळ जायचा. इतकेच नाही तर टीव्हीवर आपण कसे दिसतोय हेदेखील बघण्यासाठी तेव्हा वेळ मिळाला नाही. टीआरपीमुळे जरी मालिका बंद झाली असली तरी यातून करिअरला नवी दिशा मिळाली आहे, असे अभिनेत्री तन्वी मल्हारा हिने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...