आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • What To Do With A Damaged, Torn Flag?, Arrangements For Acceptance In Four Ward Offices Of Jalgaon Municipal Corporation, Collection From Wednesday

खराब, फाटलेल्या ध्वजाचे काय करणार?:जळगाव महापालिकेच्या चार प्रभाग कार्यालयात स्वीकारण्याची व्यवस्था

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्ती यंदा हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात आले. नागरिकांनी यास उत्स्फुर्त प्रतिसाद देत घराेघरी तिरंगा फडकविला. परंतु पावसाने किंवा इतर काही कारणामुळे राष्ट्रध्वजाला शती पाेहचली असेल. फाटला असेल तर अशा ध्वजाचे काय करायचे हा प्रश्न तुम्हाला भेडसावत असेल, तर या ध्वजाला महापालिकेत जमा करता येणार आहे. पालिकेच्या चार प्रभाग समिती कार्यालयात बुधवारपासून असे नष्ट करण्यायाेग्य ध्वज संकलित केले जाणार आहे.

प्रत्येक राष्ट्रभक्ताला तिरंग्याबाबत आदर आहे. त्या आदरापाेटीच अगदी झाेपडीपासून लक्झरी बंगले, अपार्टमेंटवर 13 ऑगस्टपासून तिरंगा फडकविण्यात आला. शहरात लाखांवर तिरंगा ध्वज लावण्यात आलेत. घरावर लावलेला राष्ट्रध्वज सूर्यास्ताला उतरवून ठेवण्याच्या सूचना होत्या. परंतु लावताना, लावल्यावर किंवा काढतांना त्याला काही शती पाेहचली असेल, जसे की फाटणे, खराब झाले असेल तर ताे ध्वज फडकविण्या याेग्य राहत नाही. त्याला नियमानुसार नष्ट करावे लागते. असेच ध्वज महापालिका संकलित करणार आहे.

प्रभाग अधिकाऱ्यांना निर्देश

महापालिकेच्या चारही प्रभाग अधिकाऱ्यांना नष्ट करण्यायाेग्य ध्वज संकलित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. ते बुधवारपासून शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या प्रभाग समिती कार्यालयात ध्वज संकलित करण्यात येतील. नागरिकांनी या ठिकाणी केवळ नष्ट करण्यायाेग्यच ध्वज आणून द्यायचे आहे. चांगले ध्वज आणू नये, असे महापालिकेचे अतिरिक्त उपायुक्त श्याम गाेसावी यांनी सांगितले.

या ठिकाणी संकलित हाेणार ध्वज

महापालिकेचे शहरात चार प्रभाग समिती कार्यालयात हे ध्वज संकलित हाेणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी याठिकाणी ते जमा करायचे आहेत.

  • प्रभाग समिती 1- सतरा मजली प्रशासकीय इमारत 6 वा मजला.
  • प्रभाग समिती 2: मनपाची लाठी शाळा, पंचमुखी हनुमान मंदिरांच्या जवळ.
  • प्रभाग समिती 3 महापालिकेचे टी.बी. हाॅस्पिटल, मेहरुण उद्यानालगत.
  • प्रभाग समिती 4: गिरणा पाण्याची टाकी, रामानंद राेड.
बातम्या आणखी आहेत...