आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Whatsapp Chatting With Person; Boiling Ransom After Sending A Video Of A Person Who Was Bloodied After The Murder And Threatening To Kill Him |marathi News

खंडणी:व्यक्तीसोबत व्हॉटस‌्अँप चॅटींग ; खूनानंतर रक्तबंबाळ झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ पाठवून तसे मारण्याची धमकी देत उकळली खंडणी

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनोळखी व्यक्तीसोबत व्हॉटस‌्अॅपवर चॅटींग करणे कासोदा येथील ग्रामस्थाला चांगलेच महागात पडले. भामट्याने प्रारंभी त्याला अश्लील व्हिडिओ पाठविला. त्यानंतर खून झालेल्या रक्तबंबाळ व्यक्तीचा व्हिडिओ पाठवून त्याप्रमाणे मृत्यू घडवून आणण्याची तसेच त्याचा अर्धनग्न फोटोही राजकीय विरोधकांना पाठवण्याची धमकी दिली. त्याच्याकडून १७ हजार रुपयांची ऑनलाइन खंडणी उकळली. त्याची पैशांची मागणी वाढतच गेल्याने त्या ग्रामस्थाने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार त्या मोबाइलधारकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील ग्रामस्थ व्हॉटसअॅप क्रमांकावर फेब्रुवारी २०२१ पासून त्या अनोळखी व्यक्तीशी चॅटींग करीत आहे. समोरील व्यक्ती त्यांना मॅसेज पाठवित होता. कामोत्तेजक भावना उत्तेजीत करणारे चॅटींग करीत होता. फेब्रुवारी २०२१ पासून त्याच्या मोबाइलवर मॅसेज येत आहेत. त्यानंतर मात्र, त्या भामट्याने खून झालेल्या रक्तबंबाळ व्यक्तीचा व्हिडिओ त्यांना व्हॉटसअॅपवर पाठविला. त्या ग्रामस्थाचा अशा प्रकारे मृत्यू घडवून आणण्याची धमकीही त्याने दिली. तसेच ग्रामस्थाचा अर्धनग्न व्हिडिओही पाठविला. निवडणुकीतील त्यांच्या विरोधकांना पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली.

त्या भामट्याने त्यांच्याकडे फोन पे क्रमांकावर पैशांची मागणी केली. ४ एप्रिल रोजी त्यांनी भामट्याला १५ हजार रुपये फोन पेवर पाठविले. ६ जून रोजी २ हजार रुपये पाठविले. त्यानंतरही त्याने वारंवार पैशांची मागणी सुरुच ठेवली. हे असह्य झाल्यानंतर त्या ग्रामस्थाने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार त्या व्हॉटसअॅप क्रमांकधारकाविरुध्द सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोबाइल क्रमांकाच्या आधारे पोलिस भामट्याचा शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...