आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गहू 350 रुपयांनी स्वस्त:जळगावमध्ये आठवडाभरात दरात घसरण; केंद्र सरकारच्या निर्यातबंदीचा परिणाम

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या निर्यातबंदीमुळे गव्हाच्या भावात तब्बल 350 रुपयांची घसरण झाली आहे.युक्रेन - रशिया युद्धाचा परिणाम सर्वच देशांवर थाेड्याफार फरकाने झालाय. युद्धामुळे भारताच्या गव्हाला आखाती देशातून 15 ते 20 लाख मेट्रीक टन निर्यातीची ऑर्डर मिळालीय. त्यामुळे भावात प्रति क्विंटलमागे तब्बल 450 रुपये दरवाढ झाली होती.

आणि गणित बिघडले...

आखाती देशांना लागणाऱ्या गव्हाचा सर्वात माेठा निर्यात देश युक्रेन. युद्धामुळे युक्रेन गव्हाचा पुरवठा करू शकत नसल्याने भारतीय गव्हाला माेठी मागणी आली. आंतरराष्ट्रीय निर्यातदार कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेतून प्रामुख्याने राजस्थान व मध्यप्रदेश या प्रमुख गहू उत्पादक राज्यातून लाखाे टन गव्हाची आगाऊ मागणी नाेंदवत जादा भावाने गव्हाची खरेदी केली. त्याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांनी खासगी बाजारातच गव्हाची विक्री केल्याने बहुतांश राज्यातील शासकीय केंद्रांवर विक्रीसाठी गहूच आला नाही. गव्हाचा शासकीय काेटा देखील पूर्ण न झाल्याने केंद्राने 15 ते 20 दिवसांपूर्वी गव्हाच्या निर्यातीसाठी परवानगीची व निर्यात मर्यादेचे बंधन टाकले. त्यामुळे गव्हाची निर्यातीत लक्षणीय घट हाेऊन देशातंर्गत गव्हाचे प्रमाण वाढीला लागले. त्याचा परिणाम म्हणून दर घसरले आहेत.

शरबती पाेहचला 3500 वर

गेल्या वर्षी 2450 असलेले सर्वसाधारण गव्हाचे दर यंदा सुरुवातीपासूनच चढते राहिले. युक्रेन युद्धानंतर निर्यात सुरू झाल्यावर ते आतापर्यंतच्या उच्चांकी 2900 वर पाेहचले हाेते. तर शरबती गव्हाचे 2600 रुपये प्रती क्विंटल असलेले दर 3500 रुपयांवर गेले हाेते.

असे आहेत गव्हाचे आजचे दर

प्रकार : प्रति क्विंटल भाव

  • 147 - 2550 - 2650
  • चंदाैसी - 4200 - 4500
  • लाेकवन - 2500 - 2550
  • शरबती - 2700 - 2800
बातम्या आणखी आहेत...