आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस तपासात समाेर आली माहिती:कारचे काेटेशन घेताना बच्छाव यांच्या शाेरूममध्ये राेकड दिसली अन‌् त्यांच्या घरावर टाकला दराेडा

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात रिंगराेडवरील अजय काॅलनीत राहणारे उद्याेजक किरण बच्छाव यांच्या घरावर दराेडा टाकण्याचा प्रयत्न झाला हाेता. त्यात पाेलिस पथकाने सात संशयितांना शनिवारी अटक केली. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अनिल उर्फ बंड्या काेळी हा वर्षभरापूर्वी कारचे काेटेशन घेण्यासाठी उद्याेजक बच्छाव यांच्या शाेरूमला गेला हाेता. तेव्हा त्याने तेथे राेजच्या व्यवहारातून आलेली राेकड बॅगेत भरताना बच्छाव यांना पाहिले हाेते. त्यानंतर ताे सलग दाेन महिने त्यांच्या कारचा पाठलाग करत हाेता. ज्या दिवशी त्याने दराेडा टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा किमान दाेन काेटी रुपये तरी मिळतील, असा त्याचा अंदाज हाेता, अशी धक्कादायक माहिती पाेलिस तपासात समाेर आली आहे.

अजय काॅलनीतील रहिवासी उद्याेजक किरण बच्छाव यांच्या निवासस्थानी पाच दिवसांपूर्वी दराेडा टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यात सात संशयितांना एलसीबीच्या पाच पथकांनी ताब्यात घेतले. पाच सीसीटीव्हींचे चार दिवसांचे फुटेज आणि संशयितांचे माेबाइल संभाषणांच्या माध्यमातून त्यांना विदगाव येथून शनिवारी पहाटे ताब्यात घेतले. मुख्य सूत्रधार अनिल उर्फ बंड्या याला पत्ते खेळण्याचे व्यसन आहे. त्यात झालेले कर्ज फेडण्यासाठी त्याने दाेन रेकाॅर्डवर असलेल्या गुन्हेगारांसह पाच नवख्यांच्या मदतीने हा प्रकार केला. पाेलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एलसीबीच्या पथकाची माहिती देण्यासाठी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली.

या वेळी एलसीबीचे निरीक्षक किसन नजन पाटील, तपासी अधिकारी जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे एपीआय किशाेर पवार यांच्यासह एलसीबीच्या पाचही पथकांचे पाेलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. घटनेनंतर पाेलिसांनी अजय काॅलनीतून पाच ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन घटना घडल्यापासून मागील आठ दिवसांचे फुटेज तपासले. त्यात घटनेच्या चार दिवस अगाेदरपासून संशयितांनी गटागटाने रेकी केल्याचे समाेर आले. विशेष म्हणजे ही रेकी सुरक्षारक्षक कुत्र्याला फिरायला घेऊन जाताे त्याचवेळी करण्यात आलेली आहे.

माेबाइल संभाषणाने छडा : अनिल उर्फ बंड्या भानुदास काेळी (वय ३२) व अर्जुन ईश्वर काेळी (वय ३१) या दाेघांविरुद्ध दारू विक्री तर सागर दिलीप काेळी (वय २८) याच्या विरुद्ध देशी कट्टा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती समाेर आली. त्यांचे माेबाइल संभाषण पाेलिसांनी टिपले. त्यात आराेपी उघडपणे घटनेची चर्चा करत हाेते. हे तिन्ही संशयित वगळता इतर पाचही जण हे ३० वर्षा आतील असून त्यांच्या नावावर यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नाही. मुख्य सूत्रधार अनिल उर्फ बंड्या असून त्याचा विदगावात हाॅटेलवजा ढाबा आहे. त्याला पत्ते खेळण्याचे व्यसन असून, त्यातून ताे कर्जबाजारी झाला हाेता. ते कर्ज फेडण्यासह झटपट श्रीमंत हाेण्यासाठी संपर्कातील तरुणांना साेबत घेऊन हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पाेलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.

संशयितांकडून दाेन गावठी पिस्तूल जप्त
संशयितांकडून दाेन गावठी पिस्तूल, चाकू जप्त करण्यात आला. तपास अधिकारी एपीआय किशाेर पवार यांनी त्यांना न्यायालयात हजर करून १४ दिवसांची काेठडीची मागणी केली. घटनेच्या वेळी संशयित हे बुरखे घालून असल्याने त्यांची आेळख पटवणे, उद्देश? इतर गुन्ह्यात सहभाग आहे का? याच्या तपासासाठी तशी मागणी केली. न्यायालयाने २३ नाेव्हेंबरपर्यंत पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...