आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजा टळली:महामार्गावर कारला वाचवताना कंटेनर कलंडला, सुदैवाने जीवितहानी टळली

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ शहरा लगतच्या महामार्गावर बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ओव्हरटेक करणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात, कंटेनर रेल्वे उड्डाण पुलावर कलंडला. यामुळे वाहतूक तब्बल १५ मिनिटे विस्कळीत झाली होती. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. जळगावकडे जाणारा कंटेनर (एच.आर.३९-ई.३२६४) कारला वाचवताना कलंडला. त्यामुळे नागरिकांनी धाव घेत ट्रकचालक अहसान आलम (रा.मेहरापूर) याला बाहेर काढले. सुदैवाने त्याला इजा झाली नाही.

बातम्या आणखी आहेत...