आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री उशिरापर्यंत शाेध सुरूच:सेल्फी काढताना तरुण गेला वाहून; गिरणेवरील कांताई बंधाऱ्याजवळची घटना

जळगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरापासून जवळच असलेल्या कांताई बंधाऱ्याजवळील नागाई-जोगाई मंदिराजवळ गिरणा नदी पात्रात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एक १७ वर्षीय तरुण पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त हाेत आहे. प्रशासनाकडून त्याचा शाेध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सेल्फी काढण्याच्या नादात त्याचा तोल जाऊन पाण्यात पडल्याची माहिती समाेर येत आहे. त्याला वाचवण्यासाठी इतरही तिघे जण नदी पात्रात उतरले असता ते देखील वाहून जात असताना त्यांना वाचवण्यात यश आले.

शिवाजीनगर येथील दूध फेडरेशनजवळ असलेल्या मिथिला सोसायटी येथील १२ ते १४ तरुण हे सहलीसाठी कांताई बंधाऱ्यावर सहलीसाठी गेले हाेते. बारा वाजेच्या सुमारास फोटो काढण्यासाठी योगिता दामू पाटील (वय २०), सागर दामू पाटील (वय २४), समीक्षा विपीन शिरोडकर (वय १७), नयन योगेश निंबाळकर (वय १७) हे नदीच्या काठाजवळ गेले होते. त्या ठिकाणी फोटो काढत असताना नयनचा पाय घसरला. त्यात ताे पाण्यात पडला. ते पाहून उपस्थित इतर तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. योगिता, सागर आणि समीक्षा या तिघांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, नयन हा वाहत्या पाण्यात वाहून गेला. त्याचा शोध घेतला असता तो रात्री उशिरापर्यंत मिळाला नाही.

बातम्या आणखी आहेत...