आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशे रुपयांच्या लोभापायी अव्वल कारकून जाळ्यात:एसीबीच्या पथकाने पकडले रंगेहात; शेतीच्या कागदपत्रांसाठी मागितली लाच

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त शेतजमीनीचे कागदपत्र देण्यासाठी शासकीय शुल्काव्यतिरीक्त पाचशे रुपयांची लाच घेणाऱ्या यावल तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकूनास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहात अटक केली.

व्यवहारात झाले वाद

मुक्तार फकिरा तडवी (वय 56, रा. लोकेशनगर, यावल) असे लाचखार कारकुनाचे नाव आहे. यावल तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावावर मौजे मोहराळे शिवारात शेतजमीन आहे. त्या शेतजमीनीचे खरेदी-विक्री व्यवहाराबाबत वाद-विवाद होते. त्यामुळे या वाद-विवादाबाबत यावल तहसीलदार यांचेकडे दावा दाखल करण्यात आला होता. या दाखल केलेल्या दाव्याबाबत तहसीलदार यांनी दिलेल्या निकालाच्या दस्तऐवजांच्या नकलांची मागणी तक्रारदार यांनी यावल कोषागार अव्वल कारकून मुक्तार फकिरा तडवी यांच्याकडे बुधवारी केली होती. मात्र, तडवी यांनी नकला देण्याच्या मोबदल्यात शासकीय शुल्का व्यतिरीक्त तक्रारदार यांचेकडे 500 रुपयांची मागणी केली.

रक्कम स्वीकारली अन्...

लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन. एन. जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जर्नादन चौधरी, सुनील शिरसाठ, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, इश्वर धनगर, प्रदीप पोळ यांच्या पथकाने सापाळा रचला होता. तडवी याने पंचासमक्ष 500 रुपये लाचेची मागणी करीत ती रक्कम तक्रारादारकडून स्वीकारली. पथकाने त्यांना रंगेहात अटक केली. या प्रकरणी तडवी याच्याविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...