आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्काळजीपणा:गोवरची साथ मिशन मोडवर असताना शाळांमधील सर्वेक्षण मात्र दुर्लक्षित

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवरची रुग्णसंख्या वाढत असल्याने एकीकडे राज्यात उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या जात असताना दुसरीकडे जळगाव शहरात मात्र अंगणवाडी, बालवाडी यांसह खासगी शाळांना गोवर सर्वेक्षणाबाबत कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाही. खासगी डॉक्टरांनादेखील अहवालाबाबत महापालिकेकडून कळवले जात नसल्याने डॉक्टर आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी बुधवारी गोवरबाबत टास्क फोर्सची बैठक घेत २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे.

राज्यात गोवरची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू पाहता जळगाव जिल्ह्यात गोवरचा उद्रेक होऊ नये व लसीकरणाअभावी कोणत्याही बालकाचा मृत्यू होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी गोवर मिशन मोडवर आणले आहे. याबाबत बुधवारी बैठक घेऊन सूचना देण्यात आल्या आहे. यात घरोघरी सर्वेक्षण करून वंचित, अल्पसंख्याक यांसह आजवर ज्यांनी लसीकरण केले नाही अशा दीड हजाराहून अधिक बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहे. यात मात्र शाळांबाबत महापालिका व प्रशासन यांना विसर पडला आहे. ज्याठिकाणी सर्वाधिक धोका आहे अशा सर्वेक्षण करण्याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाही. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवताना पालक मात्र चिंतेत आहे. दरम्यान रुग्णांसाठी महापालिका रुग्णालयात अलगीकरण कक्ष तयार करण्यात येणार असून गंभीर लक्षणे असल्यास रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार केले जाणार आहे.

नॉर्मल आजारपणातही लसीकरण सर्दी, ताप, खोकला असला तरी लोक आपल्या मुलांना लसीकरणासाठी घेऊन जात नाही. परिणामी काही दिवसांनी लसीकरणाचा विसर पडून साखळी ब्रेक होते. त्यामुळे बाळाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होत नाही. नॉर्मल सर्दी, खोकला व ताप कमी प्रमाणात राहिल्यास लसीकरणाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. अशा परिस्थितीत देखील बाळाला लस देता येईल. गोवर हा एकदाच होणारा आजार असल्याने लसीकरण गरजेचे असल्याची बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश भोसले यांनी सांगितले.

शहरात २७ बालवाडीत एकूण १३०० विद्यार्थी शहरात एकूण २७ बालवाडी असून याठिकाणी १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. अथवा शिक्षकांना देखील नेमके विद्यार्थी कसे ओळखावे याबाबत काेणतेही प्रशिक्षण देण्यात आले नाही. त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...