आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार:मनपा आयुक्त कोण; आज होणार फैसला

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवडाभरापासून महापालिकेच्या आयुक्त पदावरून न्यायालयीन वाद निर्माण झाला आहे. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीचे आदेश शासनाने दिले होते. डॉ. गायकवाड यांच्या जागी देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

पवार यांनी ३० रोजी तातडीने पदभार स्वीकारत मनपाचा कारभार पाहायला सुरुवात केली आहे. दरम्यान, शासनाने केलेल्या बदलीच्या आदेशाला डॉ. गायकवाड यांनी मॅटमध्ये धाव घेत स्थगिती मिळवली आहे. असे असतानाही आयुक्तपदी पवार कायम आहेत. या संदर्भात मॅटमध्ये नऊ डिसेंबर रोजी कामकाज होणार आहे. या वेळी शासनातर्फे आपली बाजू मांडली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...