आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:आईच्या निधनाच्या 8 दिवसांतच तिच्या दागिन्यांवरून दोन भावांमध्ये हाणामारी

यावल (जि.जळगाव)2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगाव जिल्ह्यातील सांगवी खुर्द येथील घटना, यावल पोलिसात गुन्हा

मृत आईच्या दागिन्यांवरून झालेल्या वादात दोन भावांमध्ये हाणामारी झाल्याची घटना सांगवी खुर्द येथे घडली. याप्रकरणी यावल पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक मुरलीधर तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आई कुसुमबाई यांचे २८ मे रोजी निधन झाले. २ जूनला अंत्यविधीनंतरचे सर्व धार्मिक विधी झाले. त्यानंतर मृत आईच्या दागिन्यांची वाटणी करण्यावरून वाद झाला. त्यात फिर्यादी अशोक यांना मोठा भाऊ शंकर व आतेभाऊ गजानन एकनाथ गाडे यांनी मारहाण, शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. नागरिकांनी हे भांडण सोडवले व अशोक तायडे यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. शंकर तायडे व गजानन गाडे या दोघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

लहान भाऊ क्वाॅरंटाइन

फिर्यादी तायडे हे बँकिंग एजंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे मोठे भाऊ शंकर व लहान भाऊ वासुदेव तायडे हे हैदराबादला असतात. अशोक व शंकर हे दोनच भाऊ आईच्या अंत्यविधीस हजर होते. वासुदेव हे क्वाॅरंटाइन असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.

या कारणावरून वाद...

लहान भाऊ वासुदेव तायडे यांनी आईला दागिने केले होते. ते सध्या क्वाॅरंटाइन असल्याने त्यांची सुटका झाल्यावर दागिन्यांची वाटणी करू, असे फिर्यादी अशोक तायडे यांनी सांगितले. मात्र, शंकर तायडे यांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यामुळे वाद होऊन हाणामारीची घटना घडली.

बातम्या आणखी आहेत...