आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादरवर्षीपेक्षा यंदा महाराष्ट्रात लवकर मान्सून दाखल होणार असल्याने शेतकरी वर्गात उत्साह होता; परंतु प्रत्यक्षात जून महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात पावसाची तब्बल ५६.१ टक्क्यांनी तूट निर्माण झाली आहे. या तीन आठवड्यात जिल्ह्यात अवघा ३४.४ मिमी पाऊस झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६.३ मिमी पाऊस कमी झाला आहे. जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात १ ते २० जून दरम्यान सरासरी ८२.५ मिमी ऐवढा पाऊस होतो. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत जिल्ह्यात ८०.७ टक्के म्हणजेच सरासरीच्या ९७.८ टक्के पाऊस झाला होता.
पहिल्या आठवड्यात ५, ६ आणि ८ जुन रोजी दमदार पाऊस झाला. तर १७ ते२० जून दरम्यान सलग चार दिवसात जोरदार पाऊस झाला होता. २३ जूनपासून मात्र पावसाने ९ जुलैपर्यंत दडी मारली होती. यावर्षी पहिल्या पंधरवड्यात पावसाने सपशेल फिरविली आहे. जिल्ह्यात १२ जून रोजी पहिल्यांदा पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर गेल्या चार दिवसात पावसाने तुरळक हजेरी लावत सरासरी ३४.५ मिमीचा टप्पा पूर्ण केला आहे. २० जुनपर्यंतच्या सरासरीनुसार हा पाऊस केवळ ४१.७ टक्के एवढाच असून ५६.१ टक्यांची पावसाची तूट निर्माण झाली आहे.
पाऊस काेसो दूर अन् तापी नदीला पूर तीन वर्षापासून जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात पावसाला सुरूवात होते ; परंतु तापी नदीला मात्र जुनच्या पहिल्याच पंधरवड्यात पाणी सोडावे लागते. मध्य प्रदेशात पाऊस झाल्याने हतनूर प्रकल्पातून पाणी सोडावे लागते. पाऊस नसतांना १४ जुन २०२० रोजी हतनूरचे १४ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले होते. मागील वर्षी १२ जून २०२१ रोजी देखील ८ दरवाजे पूर्णपणे उघडून तापीत पाणी सोडण्यात आले होते. यावर्षी देखील १७ जून रोजी चार दरवाजे उघडून हतनूरमधून पाणी सोडण्यात आले आहे.
पर्जन्य कमी पण पाणीसाठा अधिक गेल्या वर्षी २० जूनपर्यंत जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये एकूण ३०.५४ टक्के जलसाठा शिल्लक होता. यात मोठे प्रकल्प ३५ टक्के, मध्यम २६ टक्के आणि लघू प्रकल्पात ८ टक्के साठा होता. यावर्षी याच दिवशी धरणांमध्ये ३४.१३ टक्के जलसाठा आहे. त्यात माेठ्या प्रकल्पात ३९ टक्के, मध्यम प्रकल्पात २६ टक्के आणि लघु प्रकल्पांमध्ये १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
खरीपाच्या पेरण्यांवर परिणाम ... यंदा दमदार पाऊस न झाल्याने अजूनही अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाची पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतात पेरणी करता येत नाही. पेरणीसाठी शेतकरी चांगल्या पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. तर लागवड होत असलेल्या कापसाची मात्र कोरड्यात लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे दाेन्ही शेतकऱ्यांची पावसाने चिंता वाढवली आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.