आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्य:भविष्यात शेतीशिवाय सर्वांगिण प्रगती अशक्य ; फाली संमेलनात शेतकऱ्यांचा सूर; आज रजनीकांत श्रॉफ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जमिनीची सुपिकता आणि मर्यादा पाहता उच्च कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून स्मार्ट पद्धतीने शेती करणे भविष्यात महत्त्वाचे ठरेल. शेती व्यवसायातून स्वत:ची उन्नती तर साध्य होते परंतु भूकेल्यांच्या पोटाला अन्न देण्याचे काम शेतकरी करतो. त्यामुळे तो जगाचा पोशिंदा ठरतो. भविष्यात शेतीशिवाय सर्वांगिण प्रगती करणे केवळ अशक्य आहे असा सूर ‘फाली’मधील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना शेतकऱ्यांतून उमटला. जैन हिल्स येथे फालीच्या आठव्या संम्मेलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात बुधवारी झाली. या प्रसंगी आघाडीच्या प्रगतीशील शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांनी जैन हिल्सच्या आकाश मैदानावर सुसंवाद साधला. त्यात उमाळे येथील उमेश खडसे, पिंपळगावचे भागवत भाऊराव पाटील, पहुरचे शैलेश कृष्णा पाटील, नायगावचे विशाल किशोर महाजन, अटवाड्याचे विशाल अग्रवाल या शेतकऱ्यांचा समावेश होता. शैलेश पाटील यांनी आपले शेती अनुभव कौशल्याचे भंडार विद्यार्थ्यांसमोर खुले केले. विशाल अग्रवाल यांनी जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून केळी, हळद, भगवा डाळिंब, टिश्यूकल्चर, अति सघन आंबा लागवड, जैन स्विट आॅरेंज असे फलोत्पादन, पांढरा कांदा, कापूस, आले, सोयाबीन, तूर, करार शेती याबाबत अनुभव सांगितले. उमाळे येथील उमेश खडसे यांनी टरबुज उत्पादनात ठिबक, तंत्रज्ञान वापराबाबतचे फायदे सांगितले. आॕटोमेशनामुळे होणारी पाण्याची बचत यावर विशाल महाजन यांनी संबोधले. रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. कंपन्यांचे व्यवस्थापक, प्रतिनिधी, मान्यवर विद्यार्थ्यांशी साधतील प्रेरणादायी सुसंवाद जैन इरिगेशन फालीच्या आठव्या संमेलनाचे प्रायोजक आहे. जैन इरिगेशनसह गोदरेज अॅग्रोव्हेट, यूपीएल, स्टार अॅग्री आणि ओम्निव्होर या कंपन्या फालीला पुरस्कृत करतात. गुरुवारी संमेलनात फाली उपक्रमाला पुरस्कृत करणाऱ्या कंपन्यांचे व्यवस्थापक व प्रतिनिधी सुसंवाद साधतील. यूपीएलचे अध्यक्ष रजनीकांत श्रॉफ, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन फालीच्या विद्यार्थ्यांशी प्रेरणादायी संवाद साधतील. तर जैन फार्मफ्रेशचे संचालक अथांग जैन हे मनोगत व्यक्त करतील.

बातम्या आणखी आहेत...