आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्लाॅट टाकलेल्या ले-आउटमध्ये १० टक्के खुली जागा (आेपन स्पेस) न साेडण्याची सवलत मिळवणारे प्रस्ताव महापालिकेकडे मंजुरीसाठी येत आहेत. ही सवलत घेण्यासाठी तेथील प्लाॅटच्या सर्वसाधारण बांधकाम क्षेत्राच्या ७५ टक्केच एफएसआय घेतला तर विकासकांना हा लाभ मिळताे आहे; परंतु त्याचा फटका नंतर हे प्लाॅट खरेेदी करणाऱ्या ग्राहकांना बसताे. असे प्लाॅट खरेदी केले तर प्लाॅटचे बांधकाम करताना ग्राहकांना २५ टक्के बांधकाम क्षेत्रावर पाणी साेडावे लागेल. अर्थात, केवळ ७५ टक्केच एफएसआय मिळेल. त्यामुळे तुम्ही घेतलेला प्लाॅटच्या ले-आउटमध्ये १० टक्के खुली जागा आहे किंवा नाही? याची खात्री करणे आवश्यक आहे. नगररचना विभागाच्या यूडीसीपीआर २०२०च्या ले-आउटबाबतच्या नवीन आलेल्या धाेरणात बदल करण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील काेणत्याही ठिकाणी प्लाॅट ले-आउट टाकताना तेथे १० टक्के जागा ही सामूहिक वापरासाठी आेपन स्पेस म्हणून साेडणे आवश्यक आहे. हा नियम तसा आधीपासूनच आहे; परंतु नवीन धाेरणानुसार विकासकांना ही जागा साेडायची नसल्यास त्या ले-आउटचा एफएसआय म्हणजे सर्वसाधारण बांधकाम क्षेत्र १०० टक्क्यांएेवजी ७५ टक्के घ्यावे लागते. म्हणजे २५ टक्के बांधकाम क्षेत्रावर पाणी साेडावे लागते.
अनेक विकासक आेपन स्पेसची १० टक्के जागा प्लाॅट पाडून विक्री करण्यासाठी २५ टक्के एफएसआय नाकारण्याचा पर्याय निवडत आहेत. ही बाब प्लाॅट खरेदी करणाऱ्या ग्राहकांपासून लपवण्याचाही प्रयत्न हाेताे. जागरूक नसलेल्या ग्राहकांना अशाप्रकारे प्लाॅट विक्री करून ठगवले जाण्याची भीती असते. प्लाॅट खरेदीच्या दस्तएेवजात केवळ प्लाॅटचे क्षेत्र आणि ले-आउट एवढाच उल्लेख असताे. त्यात एफएसआय किती टक्के आहे याची माहिती नसते. ही माहिती बांधकाम परवानगी घेताना दिली जाते. खुल्या प्लाॅटच्या खरेदीखतात तसा उल्लेख नसल्याने तेथे ग्राहकांची फसवणूक हाेण्याची भीती असते. बहुतांश वेळा खरेदी केलेल्या प्लाॅटवर ग्राहक अनेक वर्षांनंतर बांधकाम करतात त्यावेळी ही फसवणूक लक्षात येते; परंतु विलंब झाल्याने त्यांच्याकडे काेणताही पर्याय शिल्लक राहत नाही.
ग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक : ग्राहकांनी प्लाॅट घेताना ताे ले-आउट एनए (बिनशेती) आहे किंवा नाही. तेथे रस्ते, गटार, वीज, पाणी याची सुविधा आहे किंवा नाही याची माहिती घेतली पाहिजे. लेआऊटमध्ये १० टक्के क्षेत्र आेपन स्पेस आणि १० टक्के अॅमिनिटीसाठी साेडावे लागते. याबाबतही ग्राहकांनी चाैकशी केली पाहिजे. तुम्ही खरेदी करीत असलेल्या प्लाॅटवर तुम्हाला एफएसआय किती मिळू शकताे याचीही माहिती घेणे आवश्यक आहे, असे या क्षेत्राचे जाणकार रमेशकुमार मुणाेत यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.