आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक‎:लॅपटॉपसाठी महिलेची‎ 85 हजारांत फसवणूक‎

जळगाव‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरीब विद्यार्थ्यांसाठी केंद्र‎ शासनाकडून अनुदानातील‎ लॅपटॉप खरेदी करून देतो अशी‎ थाप मारून दोघांनी एका महिलेची‎ ८५ हजार रुपयांत फसवणूक‎ केली. चित्रलेखा कांतिलाल‎ मालपाणी (वय ३३) यांची‎ फसवणूक झाली आहे.

किरण‎ मुरलीधर फेगडे व रोहन महेंद्र‎ फेगडे (दोघे रा. मस्कावद ) यांनी‎ मे महिन्यात मालपाणी यांना भेटून‎ तीन लॅपटॉप अनुदानातून कमी‎ किमतीत मिळवून देण्याचे‎ आश्वासन दिले. मालपाणी यांनी‎ ७० टक्के रक्कम म्हणजेच ९५‎ हजार दिले. पैसे घेऊन देखील‎ दोघे जण लॅपटॉप देत नव्हते. नंतर‎ त्यांनी १० हजार मालपाणी यांना‎ परत केले. दरम्यान, आपली‎ फसवणूक झाल्याचे मालपाणी‎ यांच्या लक्षात आले. त्यांनी शहर‎ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.‎

बातम्या आणखी आहेत...