आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर सावधान:फ्लिपकार्ट कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून महिलेची 39 हजारांची फसवणूक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लिपकार्टवरून मागवलेली वस्तू फुटलेली असल्यामुळे परत करण्यासाठी कस्टमर केअरला फोन केला असता एका महिलेची 39 हजार 500 रुपयात ऑनलाइन फसवणूक झाली. 2 जून रोजी ही घटना घडली. तर 4 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तब्बसुमबी शेख जाहिद (रा. दंगलग्रस्त कॉलनी) यांची फसवणूक झाली आहे. शेख यांचा केक बणवण्याचा व्यवसाय आहे. दोन काही दिवसांपूर्वी त्यांनी फ्लिपकार्टवरुन काचेच्या वस्तू मागवल्या होत्या. दोन जून रोजी वस्तु त्यांना घरपोच मिळाल्या. परंंतु, काही वस्तु फुटलेल्या असल्याने त्यांनी परत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुरूवातीला त्यांनी फ्लिपकार्टच्या 6370806923 या कस्टमर केअर नंबरवर फोन केला. समोरील व्यक्तीने त्यांना 9893613611 या क्रमांकावर फोन करण्याचे सुचवले. त्यानुसार शेख यांच्या मुलांनी फोन केला.

यावेळी भामट्याने त्यांना सुमारे 40 मिनीटे बोलण्यात गुंतवूण ठेवले. पैसे परत मिळवण्यासाठीची प्रक्रिया सांगत असताना एक अ‌ॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. हे अ‌ॅप डाऊनलोड करताच शेख यांच्या मोबाइलचे संपूर्ण नियंत्रण भामट्याने ताब्यात घेतले. बँकेची माहिती घेतलेली असल्यामुळे ओटीपी नंबर मिळवून घेत शेख यांच्या खात्यातून 39 हजार 500 रुपये परस्पर वळवून घेतले. थोड्या वेळाने हा प्रकार लक्षात येताच शेख यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशाेर पवार तपास करीत आहेत. त्यामुळे जर तुम्ही देखील ऑनलाइन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अतिशय काळजीपूर्वक खरेदी करा. नवीन असलेल्या ई कॉमर्स वेबसाइटचा वापर करणं शक्यतो टाळा.

बातम्या आणखी आहेत...