आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराेटरी इलाइट क्लब आयाेजित विनामूल्य प्लास्टिक सर्जरी शिबिरातील ४५ वर्षीय महिलेवर प्लास्टिक सर्जरी सुरू असताना तिला हृदयविकाराचे दाेन वेळा झटके आले. त्यात तिची प्रकृती गंभीर हाेऊन अतिदक्षता विभागात उपचार घेत असताना मृत्यू झाला. ही घटना शहरातील इंडाे-अमेरिकन हाॅस्पिटलमध्ये घडली.
महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीय व परिचितांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आराेप करून रविवारी सकाळी सुमारे अडीच तास वाद घातला. शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डाॅक्टरांच्या पॅनलच्या उपस्थितीत शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. राेटरी क्लबच्या वतीने गेल्या १५ वर्षांपासून शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींसाठी विनामूल्य प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयाेजन केले जाते. यंदाही ते केले हाेते. शनिवार व रविवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार हाेत्या. त्यानुसार शनिवारी शस्त्रक्रिया सुरू हाेत्या. त्यात नाशिक येथील मायाबाई सुनील देवरे या जळीत महिलेला शनिवारी दुपारी साडेचार वाजता शस्त्रक्रिया कक्षात घेतल्यावर भूलतज्ज्ञ डाॅ. पूनम लढे यांनी तपासून डाॅ. शंकर श्रीनिवासन (सुब्रमण्यम) यांनी शस्त्रक्रियेला सुरुवात केली. मात्र, या वेळी तिला हृदयविकाराचा झटका आल्याने शस्त्रक्रिया थांबवून अतिदक्षता विभागात दाखल केले. लाइफ सेव्हिंग सिस्टिमद्वारे उपचार सुरू असताना तिला रविवारी सकाळी पुन्हा हृदयविकाराचा दुसरा झटका आला. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन वेळा ईसीजी काढून मृत घाेषित केले.
पाेलिसांनी काढली समजूत : नातेवाइकांनी इंडाे अमेरिकन हाॅस्पिटल मध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत वाद घालून मृत्यूला जबाबदार असल्याचा आराेप केला. शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, एपीआय देविदास पाेटे यांच्यासह पाेलिसांनी समजूत काढून शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.