आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दिराचे वर्षश्राद्ध आटोपून घरी येताना अपघात, महिला ठार; एकलग्नजवळ अपघात, मृत महिला जळगावची

जळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकलग्नजवळ सोमवारी रात्री ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास महामार्गावर दुचाकी-कारचा अपघात झाला. धरणगाव येथे दिराच्या वर्षश्राद्धचा कार्यक्रम आटोपून जळगावला दुचाकीवर परत येत असलेल्या महिलेचा या अपघातात मृत्यू झाला.

त्यांचा मुलगा व नात जखमी झाले.
विजया भगवानसिंग पुर्भे (वय ५५, रा. भिकमचंद जैननगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा चेतन पुर्भे यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची मुलगी दीप्तीच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...