आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:वक्तृत्व अन‌् रांगाेळी स्पर्धेतून महिलांनी‎ ‘क्लीन व्हिलेज’चे पटवून दिले महत्त्व‎

जळगाव‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायमाती फाउंडेशनतर्फे महिलांसाठी‎ वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या‎ महिलांनी ‘क्लीन व्हीलेज’चे महत्त्व‎ पटवून सांगितले.‎ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून‎ प्रदीप साळुंखे, प्रमोद साळुंखे हे‎ उपस्थित होेते. सुहास पाटील, वत्सला‎ पाटील, अर्चना महाजन, संगीता‎ सपकाळे, कृषी विभागातील शिवाजी‎ राऊत, मिलिंद वाल्हे, सोनू पाटील यांनी‎ मार्गदर्शन केले.

‘माझे गाव, माझी‎ जबाबदारी, ग्रामविकासात महिलांच्या‎ पुढाकाराचे महत्त्व’ हा विषय वक्तृत्व‎ स्पर्धेसाठी देण्यात आला हाेता. गावाचा‎ सरपंच कसा असावा, स्वच्छतेच्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दृष्टीने गावामध्ये असलेल्या त्रुटी,‎ आरोग्याच्या समस्या यावर महिलांनी‎ मते मांडली. यात दहा महिलांनी यात‎ सहभाग घेतला. तसेच रांगोळी स्पर्धाही‎ घेण्यात आली. यात ३४ मुलींनी सहभाग‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घेतला. मायमाती फाउंडेशनच्या‎ अध्यक्षा प्रभावती पाटील यांनी महिलांना‎ मार्गदर्शन केले. सचिन बाविस्कर यांनी‎ सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक चंदा‎ चौधरी यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...