आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्ह्यात उष्माघातामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान 45 अंश सेल्सियसवर जाऊन पोहोचले आहे.
अमळनेरमधील ही महिला असून रुपाली राजपूत असे या मृत महिलेचे नाव आहे.
नक्की झाले काय?
रूपाली या एका विवाह समारंभासाठी अमरावती गेल्या असताना रेल्वेतून प्रवास करत भर उन्हात घरी परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उलट्यांचाही त्रास सुरू झाला. फॅमिली डॉक्टरांकडून प्राथमिक उपचार करून घेतले होते. मात्र, काही वेळानंतर पुन्हा उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने त्यांची शुध्द हरपली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी रुपाली यांना मृत घोषित केले.
मोसमातील पहिला बळी
रूपाली राजपूत यांचे शवविच्छेदन केले असता उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.उष्माघातामुळे जळगाव जिल्ह्यातील यंदाच्या मोसमातील उष्माघाताच्या पहिल्या बळी ठरल्या आहेत.
रावेर तालुक्यात देखील नम्रता चौधरी नावाची महिला आपल्या कुटुंबासोबत भर उन्हात नातेवाईकांकडे एका धार्मिक कार्यासाठी गेली होती. परतत असताना बस स्थानक परिसरात उलट्या झाल्याने चक्कर येऊन पडले. नंतर तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उष्माघातापासून वाचण्यासाठी...
कडक उन्हात घराबाहेर पडल्यावर अस्वस्थ वाटू लागते. अशावेळी सर्वप्रथम सावलीचा आधार घ्यावा. थंड सावलीच्या ठिकाणी बसणे, डोके, मान आणि घड थंड पाण्याच्या पट्ट्यानी पुसून काढावे, असे उपाय त्वरित करावेत. यामुळे शरीराचे तापमान पूर्ववत होण्यास मदत होते. पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलाचा वापर करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करावा.
संबंधित वृत्त
वैशाख वणवा पेटला:भुसावळचा पारा @ 45.7 अंश; 13 मे पर्यंत तापमानात पुन्हा वाढीचा अंदाज
हॉटसिटी वाचा सविस्तर येथे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.