आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:लायन्स क्लबच्या कार्यक्रमात महिलांनी‎ गीते, नृत्य सादर करून लुटला आनंद‎

जळगाव‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब जळगाव सेंट्रलतर्फे‎ सोमवारी भाऊंचे उद्यानात जागतिक‎ महिला दिनानिमित्त सामाजिक कार्य‎ करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात‎ आला. या वेळी महिलांनी गीते, नृत्य‎ सादर करून आनंद लुटला.‎ कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून‎ महापालिका आयुक्त डॉ. विद्या‎ गायकवाड, डॉ. केतकी पाटील, डॉ.‎ श्रद्धा चांडक. अॅड. शुचिता हाडा, अॅड.‎ महिमा मिश्रा, सीए राजानी केजरीवाल‎ उपस्थित होत्या.

क्लबचे अध्यक्ष‎ किशोर बेहेरानी, सचिव दिनेश बोरा,‎ कोषाध्यक्ष दिनेश बाफना यांनी‎ मान्यवरांचे स्वागत केले. सामाजिक‎ कार्य करीत असलेल्या प्रेमा जवाहरानी,‎ संगीता चावला, पुष्पा भंडारी, आनी‎ सिंह, श्वेता चांडक यांचा सन्मान‎ करण्यात आला. तुषार केशवानी यांच्या‎ पथकाने महिला शक्तीवर नृत्य सादर‎ केले. रेशमा बेहरानी, रानी बाफना यांनी‎ सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे‎ नियोजन किर्ती बोरा यांनी आभार‎ मानले. गिरीश शिसोदिया, जयेश‎ ललवानी आदींनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...