आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनानिमित्त बांभोरी प्र.चा. (ता. धरणगाव) येथे समता फाउंडेशन (मुंबई) व बांभोरी प्र.चा. उपकेंद्र व ग्रामपंचायतीतर्फे गर्भवती महिला, कुपोषित बालक व अति जोखमीच्या गर्भवती माता यांची आरोग्य तपासणी करून माेफत आैषधाेपचार करण्यात आले. ग्रामविकासासाठी धडपडणाऱ्या महिलांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार झाला.
सरपंच सचिन बिऱ्हाडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रीती पाटील यांनी मार्गदर्शन केले. समता फाउंडेशनचे राजेंद्र दाैड यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. अश्विनी नन्नवरे, आशा सेविका सपना नन्नवरे, अंजना नन्नवरे, सोनी नन्नवरे, नीता साळुंके, अंगणवाडी सेविका इंदूबाई ठाकरे, आशा बडगुजर, अनिता सोनवणे, रंजनाताई नन्नवरे, शोभा सपकाळे, अंजना सपकाळे, अनिता साळुंके, शिक्षिका सविता बाविस्कर, आशा भालेराव, मीरा नन्नवरे, यांचा पुस्तके व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य जगदीश नन्नवरे, संदीप कोळी, अमोल नन्नवरे, एमपीडब्ल्यू प्रशांत पाटील, महेश बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.