आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:"प्रगतीसाठी महिलांचा पुढाकार हवा''‎ ; आदिवासी पारधी-टाकणकार समाज महिला मेळावा‎

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामोद‎ महिलांच्या कार्यक्षेत्रात पुरुषांप्रमाणे‎ वाढ झाली. पूर्वी चूल आणि मूल‎ एवढेच महिलांचे क्षेत्र होते. परंतु‎ आता सर्वच क्षेत्रात महिलांचा‎ पुढाकार आहे. त्यामुळे पारधी‎ समाजाच्या प्रगतीसाठी देखील‎ महिलांनी पुढे आले पाहिजे असे‎ प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा‎ सुनीता सोळंके यांनी केले. त्या‎ देवाशिष लॉन मध्ये शुक्रवार, दि.७‎ एप्रिल रोजी आयोजित आदिवासी‎ पारधी - टाकणकार समाजाच्या‎ महिलांचा मेळाव्या‎ अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.‎ डॉ.शितल पवार यांच्या प्रमुख‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार‎ पडला. आदिमाया नारी शक्ती‎ आदिवासी पारधी -टाकणकार‎ महिला मंडळाच्या वतीने या‎ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होते.‎ मेळाव्याच्या सुरुवातीस मान्यवरांच्या‎ हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची‎ सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर‎ जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा‎ रुग्णालय डॉ.शितल पवार यांनी‎ महिलांना आरोग्या विषयी मार्गदर्शन‎ केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा‎ मालवे अमरावती यांनी केले. तर‎ सूत्रसंचालन जया सोळंके केले तर‎ आभार कल्पना सोळंके यांनी‎ मानले. या कार्यक्रमास तालुक्यातील‎ बहुसंख्येने पारधी-टाकणकार‎ महिला उपस्थित होत्या. मेळाव्यात‎ तालुक्यातील आजी, माजी महिला‎ सरपंच, पंचायत समिती सदस्य,‎ जि.प.सदस्य यांचा सत्कार करण्यात‎ आला. वृक्षारोपण करून‎ कार्यक्रमाची सांगता करण्यात‎ आली. या कार्यक्रमास शहरातील‎ समाज बांधवांनी मोलाचे सहकार्य‎ केले.‎