आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी वाढल्याने नवीन वर्षात वूलन बाजार गरम:जानेवारीच्या पाचच दिवसांत अडीच महिन्यांची कमाई; विक्रेत्यांना दिलासा

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन - तीन दिवसांपासून राज्यात थंडी वाढली आहे. असे असताना जळगावमध्ये गरम कपड्यांची दुकानेही गजबजायला लागली आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात या स्वेटर विक्रेत्यांकडे शुकशुकाट होता. मात्र, याची भरपाई जानेवारी महिन्याच्या केवळ पाचच दिवसांनी भरून कढली असल्याचे असे स्वेटर विक्रेत्यांनी सांगितले.

नवीन वर्ष सुरू होताच जानेवारीच्या पहिल्या दिवसापासूनच हवेत गारवा वाढू लागल्याने गुलाबी थंडी पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सकाळी फिरायला जाण्यापासून ते दिवसभर गरम कपडे, मफलर, कान टोपी वापरतांना नागरिक दिसू लागले आहे.

शिवतीर्थ मैदानावर तिबेटियन व महाराष्ट्रीयन विक्रेत्यांनी गरम कपड्यांची दुकाने थाटली आहेत. मात्र, गेल्या अडीच महिन्यात अपवाद सोडला तर थंडी अशी जाणवलीच नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिना सोडला तर संपूर्ण डिसेंबर महिन्यात स्वेटर खरेदीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, याची भरपाई जानेवारीच्या पाचच दिवसांत झाली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात थंडी कमी असल्याने स्वेटर खरेदीसाठी आलेल्या 10 ग्राहकांमध्ये केवळ एखाद दुसरा खरेदी करत होता. मात्र, जानेवारी महिन्यात केवळ पाचच दिवसांत 10 खरेदीदारांमध्ये 8 ते 9 ग्राहक खरेदी करत असल्याचे प्रमाण स्वेटर विक्रेत्यांनी सांगितले.

150 ते अडीच हजार रुपयांपर्यंत स्वेटर

महाराष्ट्रीयन व तिबेटीयन स्वेटर विक्रेत्यांकडे 150 ते अडीच हजार रुपयांपर्यंत स्वेटर विक्रीला उपलब्ध आहेत. बाजारात जॅकेट, स्वेटर्स, बिन बाह्यांचे स्वेटर्स, महिलांसाठी लोकरी कोट, लहान मुलांसाठीचे जॅकेट्स, बुलबूल वूल, फैदर वूल, मखमल वूल आदी प्रकारचे गरम कपडे उपलब्ध आहेत. यात मफलर, टोप्या, कानटोप्या, कान पट्ट्याही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

पाचच दिवसांत अडीच महिन्यांची भरपाई

शिवतीर्थ मैदानावर गेल्या अडीच महिन्यांपासून महाराष्ट्रीयन व तिबेटीयन विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. मात्र, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात म्हणावी तशी थंडी पडली नाही. त्यामुळे या दरम्यान म्हणावी तशी विक्री झाली नाही. मात्र, गेल्या पाचच दिवसांत खरेदीसाठी येणाऱ्या 10 जणांमध्ये 8 ते 9 जण स्वेटर खरेदी करत असल्याने अडीच महिन्यांची भरपाई या पाचच दिवसांत झाली आहे.

- सिरीन युल्डन, स्वेटर विक्रेत्या

बातम्या आणखी आहेत...