आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शकतत्त्वे जाहीर:पदवीच्या चौथ्या वर्षाला आता कार्यानुभव; संशोधन अनिवार्य

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रोजगाराभिमुख शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने कार्यानुभवाचे प्राध्यापक (प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस) ही संकल्पना अंमलात आणली आहे. उद्योग, व्यवसाय किंवा कला क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा थेट उच्च शिक्षणात सहभाग वाढावा त्यातून कौशल्यक्षम विद्यार्थी घडावे म्हणून या नव्या प्राध्यापक श्रेणीची निर्मिती करण्यात आली आहे. नुकतेच यूजीसीने याबाबत मार्गदर्शकतत्त्वे जाहीर केले आहे.

वर्गखोल्यांत बंदिस्त झालेल्या पारंपरिक अभ्यासक्रम अव्यवहार्य ठरत आहे. त्यामुळे व्यवसायभिमुख आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील अनुभवाची जोड शिक्षणपद्धतीला देण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पदवीच्या चौथ्या वर्षाला कार्यानुभव किंवा संशोधन अनिवार्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्राध्यापकांची ही श्रेणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुस्तकांपुरते मर्यादित झालेल्या अभ्यासक्रमात सध्या अनुभवात्मक शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे देशातील प्रज्ञावंत आणि कुशल तज्ज्ञांचा प्रत्यक्ष शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न असून, यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्याचबरोबर शिक्षणात समाजाभिमुखता, नवउद्योजकता, व्यवसायभिमुखता, प्रशासन पूरकता वाढेल असे यूजीसीचे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी जाहीर केले आहे.

कार्यानुभव प्राध्यापकांवर जबाबदारी
रोजगाराभिमुख असे अभ्यासक्रम निर्मिती,नवोपक्रम, उद्योजकता प्रकल्पांत मार्गदर्शन,उद्योग, शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय ठेवणे,कार्यशाळा, परिसंवाद, व्याख्याने, प्रशिक्षण,संयुक्त संशोधन प्रकल्पांची आखणी करणे.

बातम्या आणखी आहेत...