आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:मूक मोर्चाची भाषा समजत नसेल तर मंत्रालय, मातोश्रीवर तलवार अन् दंडुके मोर्चा काढणार

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अ. भा. छावा संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांचा इशारा

राज्यातील विद्यमान व पूर्वीच्या दाेन्ही सरकारने मराठा अारक्षणाचा वापर केला अाहे. अाताचे सरकार तीन पक्षांचे अाहे. तिघांच्या जाहीरनाम्यात मराठा अारक्षणाचे अाश्वासन हाेते, परंतु अाता केंद्राकडे अाणि न्यायालयाकडे बाेट दाखवले जात आहे. सरकारला जर मूक माेर्चाची भाषा समजत नसेल तर अाक्रमक भूमिका घ्यावी लागेल. याबाबत येत्या २५ राेजी पुणे येथील बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून अाता माताेश्री व मंत्रालयावर तलवार व दंडुके माेर्चा काढण्यात येईल, असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे ५ जुलैपासून राज्यभर दाैरे सुरू अाहेत. शुक्रवारी ते जळगावात नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील समाजबांधवांशी चर्चा व अागामी रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचे अायाेजन करण्यात अाले हाेते त्या वेळी ते बाेलत हाेते.मराठा अारक्षण प्रश्नावर अाताच्या व अगाेदरच्या दाेन्ही सरकारांनी समाजाच्या ताेंडाला पाने पुसली अाहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे. पण ते घेत नाहीत असे नानासाहेब जावळे यावेळी म्हणाले. पुण्याच्या बैठकीत हाेईल निर्णय : पाच जुलैपासून मराठा समाजबांधवांच्या भेटी घेण्यासाठी राज्यभर दाैरे केले जात अाहेत. हा दाैरा संपल्यावर २५ राेजी पुणे येथे बैठकीचे अायाेजन करण्यात अाले अाहे. या बैठकीत अागामी भूमिकेबाबत धाेरण निश्चित केले जाईल, असे जावळे पाटील यांनी या वेळी सांगितले.

माेर्चात १० हजार समाजबांधवांची हजेरी
अारक्षणप्रश्नी न्याय मिळण्यासाठी निकराची लढाई असलेल्या तलवार व दंडुके माेर्चात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून १० हजार समाजबांधवांचा सहभाग अपेक्षित असणार अाहे. या माेर्चात राज्यभरातून किमान साडेतीन ते चार लाखांचा जनसमुदाय असेल.

बातम्या आणखी आहेत...