आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवस नि:शुल्क कार्यशाळा:आयएमआरमध्ये नोकरीच्या संधी विषयावर १० पासून कार्यशाळा

जळगाव12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केसीई सोसायटी संचलित इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात ‘एमबीए प्रवेश, नोकरीच्या संधी’ विषयाबाबत १० ते १३ ऑगस्ट असे चार दिवस नि:शुल्क कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

एमबीएनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या असंख्य संधी प्राप्त होत असतात. साहजिकच त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते. प्रवेश क्षमता मर्यादित तर परीक्षा देणारे विद्यार्थी जास्त असल्याने प्रवेशासाठी अगदी अटीतटीच्या परिस्थितीला विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच प्रवेशपरीक्षेला चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने एमबीए अभ्यासक्रम, त्यानंतरच्या संधी, प्रवेश परीक्षेचे स्वरुप, अभ्यासक्रमाचा सराव, परीक्षेला कसे सामोरे जावे, महाविद्यालय कसे निवडावे, नोकरीच्या संधी कुठून मिळतील? या सर्व विषयांवर कार्यशाळेत सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समन्वयक डॉ. पराग नारखेडे यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे, असे आयएमआरच्या संचालिका प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...