आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:उत्पादन; गुंतवणुकीवर गुरुवारपासून कार्यशाळा

जळगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योग संचालनालयामार्फत ‘गुंतवणुकीला प्रोत्साहन, सुलभता, निर्यात आणि एक जिल्हा उत्पादन’ या विषयावर २९ व ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसीतील प्रेसिडेंट कॉटेजमध्ये कार्यशाळा आयोजित केली आहे.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा होणार आहे. जिल्ह्यातील निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, निर्यातदार व प्रगतीशील शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, राज्य शासनाचे अधिकारी, निर्यात प्रचलन समितीचे सदस्य, निर्यात विषयक कामकाज करणारे सर्व घटक, व्यापारी बँकांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित केले आहे. निर्यात वृद्धी, उद्योग विषयक गुंतवणूक वृद्धी, एक जिल्हा एक उत्पादन याबाबत विविध तज्ञांचे मार्गदर्शन होईल.