आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य राठी विशेष:सडपातळ होण्याच्या चुकीच्या पद्धतीने तरुणींमध्ये जडतोय अॅनोरेक्सिया, १० टक्के रुग्णांमध्ये लक्षणे; क्षयरोग, वंध्यत्वासारख्या गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी किती जाड झालीय ना... मला अजून थोडं बारीक झालं पाहिजे म्हणजे परफेक्ट फिगर वाटेल. मुलगी वयात आली की जसे आरशासमोर उभे राहून होणारे संवाद अगदी कॉमन असतात. त्यामुळेच तर झिरो फिगरची तरुणींमध्ये क्रेझ वाढली असून बारीक होण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने विविध आजार उद्भवत आहे. परदेशातील मुलींमध्ये दिसून येणार अॅनोरेक्सिया या आजाराचे रुग्ण हा जळगाव जिल्ह्यातही आढळून येत आहे. १०० मध्ये किमान १० रुग्ण असे असतात.

ही आहेत आजाराची लक्षणे
एखाद्या व्यक्तीला वजन वाढण्याची किंवा जाड होण्याची भीती वाटत रहाते. क्षुधानाश झालेल्या व्यक्ती त्यांचे जेवण कमालीचे कमी करतात. त्यांच्या खाण्याच्या पद्धतीही विचित्र होत जातात. जेवणाचे छोटे तुकडे करणे किंवा ते ताटामध्ये फिरवणे, धावपळीचा दिवस असो की तब्येत खराब असो तरीही व्यायाम करणे, लघवी होण्यासाठी गोळ्या घेणे, भूक कमी होण्यासाठी गोळ्या घेणे.

विकाराचे हे आहेत दुष्परिणाम

  • क्षुधानाश ही अशी अवस्था आहे ज्यात शरीराला पोषकद्रव्ये मिळत नाही,
  • शरीराची बांधणीच अशक्त झाल्याने गुंतागुंत निर्माण होऊ शकतात.
  • डागाळलेली,पिवळ्या रंगाची त्वचा होऊन तिच्यावर अतीशय बारीक केस येतात.
  • सतत गोंधळलेपणा येतो. स्मरणशक्ती क्षीण होऊन निर्णय क्षमताही कमी होते.
  • तोंड कोरडे होते, थंडी वाजते, हाडे ठिसूळ होतात, नैराश्य येते प्रतिकारशक्ती कमी होऊन टीबी होतो,
  • भविष्यात वंध्यत्वासारखे आजार देखील उद्भवतात.
बातम्या आणखी आहेत...