आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रोत्सव:येळकोट येळकोट.. जय मल्हार..च्या गजरात खंडाेबा यात्रा सुरू‎

जळगाव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फैजपूर येथील मल्हारी मार्तंड खंडोबा‎ यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी‎ महाआरती, अभिषेक तसेच विधिवत‎ पूजा हाेऊन यात्रोत्सवाला मोठ्या‎ उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच‎ दिवशी हजाराे भाविकांनी येळकोट..‎ येळकोट..जय मल्हारऽऽ..चा गजर‎ करून दर्शनाचा लाभ घेतला.‎ भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिस‎ बंदाेबस्तासह साेयीसुविधा उपलब्ध‎ करून देण्यात आल्या आहेत.‎

खान्देशातील ‘प्रतिजेजुरी’ असे‎ महत्त्व व सुमारे दीडशे वर्षांची परंपरा‎ लाभलेल्या फैजपूरच्या खंडोबा‎ यात्रोत्सवास सालाबादप्रमाणे‎ परंपरागत पद्धतीने फाल्गुन शुद्ध‎ पौर्णिमेला साेमवारी संध्याकाळी सात‎ वाजता महामंडलेश्वर जनार्दन हरीजी‎ महाराज, गादीपती महामंडलेश्वर‎ पुरुषोत्तम दास महाराज,‎ स्वामिनारायण देवस्थानचे भक्ती‎ किशोरदास महाराज, अमोल हरिभाऊ‎ जावळे, राजू राणे यांच्या हस्ते‎ महाआरती करून यात्रोत्सवाला प्रारंभ‎ झाला.

तत्पूर्वी सायंकाळी ५ वाजता‎ गादीपती महामंडलेश्वर पुरुषोत्तम दास‎ महाराज, राममनोहर दासजी, पवन‎ महाराज यांच्या हस्ते देवस्थानातील‎ जागृत अश्वारूढ खंडोबाराया,‎ म्हाळसाई व बाणाई माता यांच्या‎ मूर्तीला पंचामृताने अभ्यंग स्नान‎ घालून नवीन वस्त्र परिधान करण्यात‎ आले. सुंदर फुलांच्या माळा अर्पण‎ करून सर्वांनी आरती गायली. तत्पूर्वी‎ ब्राह्मण पुरोहितांनी विधिवत पूजा‎ केली. यजमान मयूर बोरोले व नरेंद्र‎ चौधरी हे सपत्नीक उपस्थित होते.‎ यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार‎ शिरीष चौधरी, डीवायएसपी‎ डॉ.कुणाल सोनवणे, डॉ.अरुणा‎ चौधरी, धनंजय चौधरी, डॉ.केतकी‎ पाटील, माजी नगराध्यक्ष मिलिंद‎ वाघुळदे यांच्या हस्ते विधिवत श्री‎ गणपती पूजन करण्यात आले. तर‎ खासदार खडसे, आमदार चौधरी,‎ डीवायएसपी डॉ.सोनवणे, डॉ.अरुणा‎ चौधरी, धनंजय चौधरी, डॉ.केतकी‎ पाटील, माजी नगराध्यक्ष वाघुळदे‎ यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.‎

भाविकांसाठी‎ शुद्ध पाणी,‎ आराेग्य सुविधा‎ स्वच्छतेवर भर‎
यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी, औषधोपचारासाठी आरोग्य पथक‎ तैनात आहे. तसेच स्वच्छतेवर अधिक भर दिला आहे. रहदारीच्या ठिकाणी‎ बॅरिकेटेड लावून कोंडी होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे भाविकांना‎ दर्शन घेणे सोयीचे होत आहे. यात्रोत्सवाचे महत्त्व लक्षात घेता तगडा पोलिस‎ बंदोबस्त तैनात आहे. यात्रोत्सव परिसरात नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे‎

बातम्या आणखी आहेत...