आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुन्ह्यात शिक्षा न होण्यासाठी कागदपत्रे तयार करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून 1 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
लाच मागणी पडताळणी वेळी पीएसआयचे तक्रारदारासोबत 'तू नव्वद दिले होते',असे संभाषण झाले आहे. त्यातून पीएसआयने त्यांच्याकडून यापूर्वीही रक्कम घेतल्याचे दिसून येते. त्याबाबत त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे कारण एसीबीने न्यायालयात दिले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ढिकले यांना 1 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्यांनी आरोपीला गुन्ह्यात शिक्षा होणार नाही,अशा पध्दतीने कागदपत्रे तयार करुन आरोपपत्र लवकर न्यायालयात सादर करण्यासाठी लाच मागितली होती. एसीबीने त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले. त्यांची पोलिस कोठडी मिळण्यासाठी न्यायालयात एसीबीकडून कारणे देण्यात आली.
एसीबीकडून दिली कारणे
लाच प्रकरणात पोलिस खात्यातील इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबतही पीएसआय ढिकले यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वीही त्यांच्याकडे तपास असलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपीच्या बाजूने कागदपत्र तयार करुन त्यांना मदत करण्याच्या मोबदल्यात लाच स्विकारली असण्याची दाट शक्यता आहे.
अपसंपदेच्या अनुषंगाने त्यांची मालमत्ता, बँक खाते, शेअर्स, विमा व आर्थिक गुंतवणुकीबाबत एसीबी माहिती घेत आहे. ढिकले यांना मेहुणबारे पोलिस ठाणे हद्दीत दबदबा आहे. गुन्ह्यातील महत्वाचे साक्षीदारांचे जबाब नोंदविणे बाकी आहेत. ते साक्षीदारांवर दबाव आणून पुरावा नष्ट करण्याची शक्यता आहे. ही कारणे एसीबीने पोलिस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी न्यायालयात दिली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.