आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटनेने खळबळ:फैजपूर येथे घरात घुसून‎ तरुणाचा महिलेवर अत्याचार‎, कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर संशयितास अटक‎

यावल‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फैजपूर शहरातील इस्लामपुरा‎ भागात एका 30 वर्षीय महिलेच्या‎ घरात जाऊन तरुणाने तिला धमकी‎ देत तिच्यावर लैंगिक अत्याचार‎ केले. घडलेला हा प्रकार महिलेने‎ कुटुंबियांना सांगितल्यानंतर फैजपूर‎ पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध लैंगिक‎ अत्याचारासह विविध कलमान्वये‎ गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास‎ अटक करण्यात आली.‎

फैजपूर येथील इस्लामपुरा‎ भागातील रहिवासी महिलेने पोलिस‎ ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार‎ मंगळवारी रात्री १० वाजेच्या‎ सुमारास महिला आपल्या घरात‎ झोपली होती. त्यावेळी शेख आरिफ‎ शेख जाबीर (वय २६) हा तरुण‎ तिच्या घरात आला आणि जर‎ कोणाला काही सांगितले आणि‎ आवाज काढला तर मी सांगेल की,‎ तुझे-माझे पूर्वीपासून अनैतिक संबंध‎ आहेत, अशी धमकी देत तिच्यावर‎ लैंगिक अत्याचार केले आणि नंतर‎ तेथून फरार झाला.

हा प्रकार‎ महिलेने कुटुंबियांना सांगितला.‎ शुक्रवारी पहाटे पूर्वी फैजपूर पोलिस‎ ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल‎ करून संशयित शेख आरिफ शेख‎ जाबीर यास पोलिसांनी अटक‎ केली. त्याची यावल ग्रामीण‎ रुग्णालयात वैद्यकीय तपासणी‎ करण्यात आली. पुढील तपास‎ फैजपूरचे सहायक पोलिस निरीक्षक‎ सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या‎ मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक‎ मोहन लोखंडे, हवालदार चेतन‎ महाजन, हर्षल चौधरी, गुलबक्ष‎ तडवी आदी करत आहेत. दरम्यान‎ या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ‎ उडाली अाहे.‎