आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्महत्या:सुशांत सिंहचे गाणे स्टेटसवर ठेवून तरुणाची आत्महत्या, जळगाव जिल्ह्याच्या शिरसोलीची घटना

जळगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह याने काही दिवसांपूर्वी मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केली. तर रविवारी शिरसोली येथील एका तरुणाने सुशांत सिंहच्या चित्रपटातील गाणे व्हाटस्अॅप स्टेटसवर ठेऊन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली. घटनेमुळे शिरसोली गावात खळबळ उडाली आहे.

तुषार ज्ञानेश्वर बारी (वय २१, रा. शिरसोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. शिक्षणानंतर तो आई-वडीलांना शेती कामात मदत करीत होता. दरम्यान, रविवारी दुपारी त्याचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. आजी व लहान बहिण घरी असताना तुषार याने मागच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी ओढणी कापून तुषारला खाली उतरवले. यांनतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह आणला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन तुषारला मृत घोषित केले. तुषार याने गळफास घेण्यापूर्वी अभिनेता सुशांत सिंहच्या चित्रपटातील गाणे व्हाटस् अॅप स्टेटसवर ठेवले होते. ‘भावांनो साथ साेडताेय साॅरी’, ‘अाय मिस यू’, ‘आय हेड लाईफ’ असे संदेशही त्याने स्टेटसवर ठेवले होते. आत्महत्या केल्यानंतर त्याच्या अनेक मित्रांनी तुषारचे स्टेटस चेक केले असता हा प्रकार उघडकीस आला. त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली? कशामुळे तो नाराज होता? या बाबत कोणालाही ठोस माहिती नव्हती. तो नाराज असल्याचे स्टेटसवरून समोर आले. या घटनेनंतर कुटंुबीय, नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला आहे.

कुटंुबीयांनी प्रचंड आक्रोश केला. तुषार याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, लहान बहिण व आजी असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

मित्रांना बसला धक्का
अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अमळनेर येथील अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती. त्यानंतर रविवारी तुषार बारी या तरुणाने देखील अशाचप्रकारे आत्महत्या केली. या घटनांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. मृत तुषार हा सुुंदर, देखणा तरुण होता. या घटनेमुळे त्याच्या मित्रांनाही प्रचंड धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...