आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पिंपळनेरमध्ये तरुण शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

पिंपळनेर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

विशाल बेनुस्कर पिंपळनेर-सटाणा रोडवरील सुदेव पॅराडाइस बिल्डींगमध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या विशाल ज्ञानदेवराव पूंडे (वय - ३४ मूळगाव- अकोला ह.मू सूदेव पॅराडाइस बिल्डींग,सटाणा रोड, पिंपळनेर ता. साक्री जि. धुळे) या तरुण शिक्षकाने घरातच बुधवारी सकाळी ८.३० वाजेच्या पूर्वी (वेळ माहिती नाही) गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पिंपळनेर-सटाणा रोडवरील सुदेव पॅराडाइस बिल्डींगमध्ये विशाल पुंडे आपली पत्नी  मोनाली व लहान मुलासोबत भाडेतत्त्वावर राहत होते. बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या उठल्या मात्र त्यांना बेडरूममध्ये पतीने गळफास घेतलेले आढळले. यावेळी विशाल पुंडे यांच्या पत्नी  मोनाली विशाल पुंडे ह्या रडत-रडत शेजारील नितेश साबळे यांच्या घरी आल्या व त्यांनी सांगितले की, माझ्या पतीने आमच्या राहत्या घरी बेडरूममध्ये पंखा अडकवण्याच्या कडीला साडी बांधून खाटेवर प्लास्टिकचा स्टूल ठेवून गळफास घेतला आहे. असे कळविल्याने नितेश साबळे यांनी शेजारी राहणारे राजेश भगवानसींग साबळे यांच्याह खात्री केली असता विशाल पुंडे यांनी गळफास घेतलेला दिसला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह खाली उतरवून खासगी वाहनाने पिंपळनेर ग्रमीण रूग्णालयत दाखल केले असता डॉ.विवेक नुक्ते यांनी तपासून मृत घोषीत केले. दुपारी उशिराने त्यांचे शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने मूळगावी न जाता पिंपळनेर मध्येच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला.त्यानुसार रात्री उशिराने त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विशाल पुंडे या तरुण शिक्षकाने गळफास का घेतली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.मात्र शैक्षणिक वर्तुळात त्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...