आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातरुणांनाे, उद्योजक होण्यासाठी सर्जनशीलता, लोकांना जोडण्याची कला, जिद्द, चिकाटी आणि पडेल ते काम करण्याची तयारी या गुणांची आवश्यकता आहे. त्यामुळे नवउद्योजकांनी हे गुण आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योजक प्रमोद संचेती यांनी केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस केंद्रातर्फे नवउद्योजकांसाठी तीन दिवसीय निवासी कार्यशाळा झाली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचेती बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी हे होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या केंद्रातर्फे आजी-माजी विद्यार्थ्यांकडून उद्योग सुरू करण्याबाबत सर्जनशील कल्पना मागवण्यात आल्या होत्या.
प्राप्त ७७ प्रवेशिकांमधून २३ विद्यार्थ्यांची निवड विद्यापीठाने केली. २३ विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे उद्योग सुरू करण्याबाबत २ ते ४ जानेवारी या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सोमवारी कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संचेती म्हणाले की, अपयश प्राप्त होऊन देखील उद्योजक व्हायचे हे स्वप्न डोळ्यासमोर असल्यामुळे उद्योजक होऊ शकलो. बाजारपेठेतील गरजा आणि बदलते स्वरूप लक्षात घेऊन काय करायचे हे निश्चित करा. यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न पहा, नफा कुठे मिळतो याचा अभ्यास करा असे सांगितले. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी भारतीय मानसिकता ते भारतीय बाजारपेठ असा प्रवास सांगताना उद्योग क्षेत्रातील नव्या कल्पना आत्मसात करा. उपल्बधता आणि समानता याव्दारे गरीब आणि श्रीमंतामधील दरी भरून काढण्याचा प्रयत्न धोरण तयार करणाऱ्यांकडून केला जात आहे.
अशावेळी सर्जनशीलतेला खूप महत्त्व आले आहे. सर्जनशीलता आणि कल्पना यावर आता मोठ्या शहरांची आणि मोठ्या शैक्षणिक संस्थाची मक्तेदारी राहिलेली नाही. छोट्या शहरांमधून देखील या कल्पना पुढे येत आहेत असे सांगून उद्योजक होण्यासाठी ध्येय निश्चिती, दृष्टिकोन हे गुण महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक प्रारंभी इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. राजेश जावळीकर यांनी केले. संचालक प्रा. भूषण चौधरी यांनी उद्योजकीय कल्पना मागवण्यामागची संकल्पना स्पष्ट केली. दुपारच्या सत्रात उद्योजक छबीराज राणे, डॉ. विवेक काटदरे, डॉ. युवराज परदेशी यांनी मार्गदर्शन केले. समन्वयक सागर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक डॉ. विकास गीते यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.