आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (पीएफआय) संबंधित शहरातील आणखी एका तरुणास जळगावच्या दहशतवादविरोधी शाखेकडून अटक करण्यात आली. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता या तरुणास त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले हाेते. त्यानंतर दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याचा जामीन मंजूर झाला.
उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा. अक्सानगर) असे या संशयित तरुणाचे नाव आहे. गेल्या आठवड्यात राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातून १०६ जणांना अटक केली आहे. या वेळी अब्दुल हादी अब्दुल रौफ (रा. जालना) याला दत्तनगरातील एका मशिदीतून अटक केली. यानंतर मंगळवारी पहाटे जळगाव दहशतवादविरोधी शाखा, एमआयडीसी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने उनैस पटेल याला घरातून ताब्यात घेतले. या वेळी त्याच्यासोबत शहाद्याचा एक तरुण होता. चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले होते. तर पटेल याला सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक करत दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीअंती त्याला जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, उनैस पटेल याचा पीएफआयशी संबंध असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. या पार्श्वभूमीवर त्याला १४ दिवस स्थानबद्ध करण्याची मागणी पाेलिसांनी केली हाेती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.