आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवासेनेकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा निषेध:राज्यपालांसह प्रसाद लाडांच्या प्रतिमांवर फेकली शाई

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा करुन चिथावणीखोर वक्तव्य करीत अाहेत. त्या निषेधार्थ युवासेनेतर्फे कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य करणारे राज्यपाल व भाजप आमदार प्रसाद लाड यांचाही युवासेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.

युवासेनेचे जिल्हाप्रमुख पियूष गांधी यांच्या नेतृत्वात गुरुवारी महानगरपालिकेसमोर निषेध आंदोलन करण्यात आले.युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी,विधानसभा क्षेत्रप्रमुख अमीत जगताप,महानगरप्रमुख अमोल मोरे,अंकीत कासार,महेश ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.युवासेनेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व आमदार लाड यांच्या प्रतिमांवर शाहीफेक करुन जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटक सरकार मस्तीमे, मिंधे गट सुस्तीमे,असे म्हणत कर्नाटक सरकारविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. भाजप नेत्यांकडून महापुरुषंाविषयी वारंवार अपमानजनक वक्तव्ये करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याचे भाजप नेते, शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री त्यावर काही बोलत नाहीत. त्यांचा युवासेनेकडून निषेध करण्यात येत आहे. प्रसाद लाड हे शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे म्हणतात. लाडांचा जन्म कुठे झाला हे तरी त्यांना माहिती आहे का? ते शिवाजी महाराजांविषयी बोलत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ते आमचे दैवत आहेत. भाजप नेत्यांनी वारंवार भावना दुखावणारे वक्तव्य करु नयेत. कर्नाटक सरकार आमची भूमी मागत आहे. त्यावरही मिंधे गट चूप आहे. आम्ही उत्तर महाराष्ट्रात राहत असलो तरी पश्चीम महाराष्ट्रातील एक इंचही जमीन त्यांना देवू देणार नाही. ठाकरे सरकारच्या गेल्या अडीच वर्षात कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील गावांसंदर्भात मागणी केली नाही.

भाजपचे सरकार येताच त्यांनी का मागणी केली? त्या संदर्भात प्रकरण न्यायाधीन आहे. भाजपला महाराष्ट्राचे विदर्भ, मराठवाडा असे तुकडे करायचे आहेत. महाराष्ट्रात समाजा समाजात वाद वाद निर्माण करुन त्यांना राज्य चालवायचे आहे. विकासाबद्दल त्यांना काहीच बोलायचे नाही. त्यासाठी इंग्रजांची निती आता भाजपने अवलंबलेली असल्याची टीका युवासेनेचे जिल्हाप्रमुख पियूष गांधी यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...