आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची कर्मचारी भरती करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संभाव्य लेखी परीक्षेचे स्वरूप जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या भरतीसाठी स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी संवर्गनिहाय वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका असतील.
या परीक्षेसाठी दहावी, बारावी, पदवी व संबंधित पदांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.
रिक्त जागा भरणार
या परीक्षेद्वारे राज्यात १८ हजार तर जळगाव जिल्ह्यात ६१२ रिक्त जागा भरल्या जातील. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, गणित, बुद्धिमापन आणि तांत्रिक विषयांशी संबंधित प्रश्न असणार आहेत. त्यात प्रत्येकी दोन गुणांचे १०० प्रश्न असतील. यासाठी दोन तासांचा कालावधी दिला जाणार असल्याचे ग्रामविकास विभागाने जाहिर केले आहे.
या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठीच्या संभाव्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ग्रामविकास खात्याने विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली होती. समितील अधिकाऱ्यांची कार्यशाळा नुकतीच झाली. यामध्ये संभाव्य परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नांची काठिण्य पातळी, प्रश्नांची संख्या, एकूण गुण आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
भरतीची जाहिरात
जळगाव जिल्हा परिषदेत गट ‘क’मध्ये १६ संवर्गातील अंदाजित ६१२ पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. आयबीपीएस या कंपनीशी सामंजस्य करार होऊन संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासोबतच एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांतून तर २० टक्के पदे अनुकंपाची या भरती प्रक्रिया दरम्यानच भरण्यात येणार आहेत.
रिक्त पदे १५ ऑगस्टपूर्वी भरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. अर्ज दाखल केल्यापासून परीक्षेपर्यंत उमेदवारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेने ०२५७-२२२४२५५ हेल्पलाइन क्रमांक उमेदवारांसाठी सुरू केला अाहे.
अशी असणार परीक्षा
विषय प्रश्न गुण मराठी १५ ३० इंग्रजी १५ ३० सामान्यज्ञान १५ ३० गणित, बुद्धिमापन १५ ३० तांत्रिक प्रश्न ४० ८० एकूण १०० २००
परीक्षेसाठी चार प्रकार निश्चित
सर्व जिल्हा परिषदांमधील मिळून कर्मचाऱ्यांच्या १८ हजार ९३९ जागा रिक्त आहेत. कर्मचारी भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी चार प्रकार निश्चित केले आहेत. या प्रकारांना अनुक्रमे अ, ब १, ब २ आणि ‘क’ अशी नावे देण्यात आली आहेत. यापैकी पहिल्या प्रकारात ११ पदे, दुसऱ्या प्रकारात १० पदे, तिसऱ्या प्रकारात एक व चौथ्या प्रकारात १७ अशी एकूण ३९ पदे भरली जातील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.