आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांची जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सततच्या बैठका, व्हिडिओ कॉन्फरन्स यामुळे सतत व्यग्र असलेल्या एकट्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर प्रशासकपदाचा भार असल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज प्रभावित होत आहे. त्यामुळे प्रशासकांनी अन्य अधिकाऱ्यांकडे प्रशासक पदाचे अधिकार विकेंद्रित होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्यानंतर २१ मार्चपासून प्रशासक म्हणून सर्व सूत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हातात आहेत. जळगावसह राज्यातील अन्य जिल्हा परिषदांमध्येही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. या जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषदेचे दैनंदिन कामकाज, महत्त्वाचे निर्णय यासाठी समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. त्यात सर्वसाधारण समिती, स्थायी समिती अधिकारासाठी स्वतंत्र समिती, अर्थ समिती, शिक्षण समिती, आरोग्य समिती स्थापन करण्यात आली आहे. जलव्यवस्थापन, बांधकाम, कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण या समित्यांसाठी एकत्रित अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती तर स्वतंत्रपणे सरपंच सल्लागार समितीची रचना करण्यात आली आहे. चार प्रमुख समित्यांमध्ये या सर्व समित्यांची कामे करण्यात येत आहे. अधिकारांचे विकेंद्रीकरण करून या समित्या स्थापन केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामांनाही वेग आला आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेत मात्र सर्व अधिकार हे प्रशासकांकडे एकवटले असून, बैठकांसाठी अधिकाऱ्यांना सीईओंवर विसंबून राहावे लागते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.