आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर 100 सेंकद स्तब्ध:लोकराजा छत्रपती शाहु महाराजांना अनोखी मानवंदना, शाहु समाधी स्थळी मान्यवरांकडून अभिवादन

कोल्हापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहू समाधी स्थळ येथे शाहु महाराजांना मान्यवरांनी अभिवादन केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 100 वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने या लोकराजाला कोल्हापूरकरांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली. आज सकाळी 10 वाजता समस्त कोल्हापुरकरांनी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून शाहु महाराजांना मानवंदना दिली.

याशिवाय कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळ येथे छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व पार पडले. यावेळी विविध विभागांचे मंत्री, खासदार, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी व नागरिकांनी शाहु महाराजांना मानवंदना दिली. कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफदेखील यावेळी उपस्थित होते.

6 मे 1922 रोजी राजर्षी शाहू महाराजांचे मुंबई येथे निधन झाले होते. याला आज 100 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने शाहु महाराजांना मानवंदना देण्यासाठी सकाळी 10 वाजता कोल्हापुरातील सर्व व्यवहार 100 सेकंदासाठी थांबवण्यात आले. दरम्यान, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त काल कोल्हापुरात आज दसरा चौक ते शाहू महाराज समाधी स्थळपर्यंत कँडल मार्च काढत लोकराजाला आदरांजली वाहण्यात आली. यात पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...