आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त शनिवारी सकाळी १० वाजता अवघे कोल्हापूर १०० सेकंदांसाठी स्तब्ध झाले. १०० सेकंद स्तब्ध उभे राहून लोकराजाला अनोखी मानवंदना देत कोल्हापूरकरांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार, कार्याचे स्मरण केले. शाहू स्मृतिस्थळ येथे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनी पुष्पहार अर्पण करून शाहू महाराजांना अभिवादन केले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, शाहूप्रेमी नागरिकांच्या “श्री शाहू महाराज की जय’ या जयघोषाने समाधिस्थळ परिसर दुमदुमून गेला. सकाळी ठीक १० वाजता रस्त्यांवरील एस.टी. बसेससह चौकाचौकातील सिग्नलवरील अन्य वाहने जाग्यावर थांबली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.